गुरुवार, ९ जून, २०११

भेट शेवटची.. अजुन बाकी आहे...

तुझं ठाऊक नव्हते, होणार नाही
मी तुझ्याचसाठी झुरले...
प्रत्येक क्षणी, हरएक दिनी
मी तुझ्या विचारात गुंतले..

सारे विश्व विसरूनी केवळ..
मी तुझ्याचसाठी जगले..
तूच असा गेलास सोडूनि
मज जगण्यास कारण नुरले..

तरीही केवळ एकाच आशेवर
मी अजुन जिवंत आहे
तुझी नि माझी भेट शेवटची..
अजुन बाकी आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा