आजकाल...
ती मला पाहतही नाही...
इतकेच काय...
ओळखही दाखवत नाही..
आलीच सामोरी
तर बोलतही नाही...
पण, तरीही...
मी तिला नेहमी पत्रे लिहितो..
तिची आठवण आली
की एखादा मिस्ड कॉल ही करतो..
कारण मला माहितीये..
जरी ती नाही बोलली..
नाही ऐकले माझे काही..
तरी.. माझी पत्रं
ती नक्कीच वाचत असेल..
मिस्ड कॉल पाहून
रिप्लाय करायची इच्छाही तिला होत असेल..
पण नेमके हेच तिला जमत नाही...
पण म्हणून तिला माझ्याबद्दल
काहीच वाटत नाही..असे मला वाटत नाही..
कारण तिच्या प्रत्येक श्वासात
माझाही एक श्वास आहे..
आणि म्हणूनच ती अजूनही 'आहे'...
यावर माझा विश्वास आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा