बुधवार, १५ जून, २०११

ती आली होती इथे..

ती आली होती इथे..
मी तिच्याच विचारात गुंग असताना...
तिची स्वप्ने पहात..
स्वप्नात तिच्याशीच गप्पा मारताना...
तिच्यासाठी मी कोण..
माझ्यासाठी ती काय ?
मग अगदी महत्वाच्या विषयांपासून ते..
नको असलेल्या गोष्टींबद्दल...
मागच्या जन्मीचे नाते..
पुढच्या जन्मीचे बंध..
अश्या अगदी जन्मभरच्या गप्पा मारुन
ती पुन्हा निघून गेली..
तेव्हा कळले
ही झोप नव्हती, स्वप्नही नव्हते..
ती तर खरेच मला आत्ताच भेटून गेली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा