एकाच नजरेत तुझ्या मी इतका घायाळ होतो
एकाच ठिणगीचा जणू क्षणात वणवा होतो
पाहताच तुला मी ना जाणे कोठे हरवून जातो
एकाच क्षणात मी सार्या दुनियेत फिरून येतो
तू नसताना तर केवळ मी तुलाच आठवतो
प्रत्येक आठवणीचा मग पाठलाग करतो
तू येशील पुन्हा तेव्हा मी काय देऊ तुजला
याच विचारामध्ये मी कित्येक जन्म जगतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा