ती आणि तो... यांचा संवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ती आणि तो... यांचा संवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २० जून, २०११

येशील कधी भेटशील कधी

येशील कधी भेटशील कधी
हरवशील कधी मज मिठीत..

श्वासात तुझ्या मी हरवतो
कधी हरवतो तुझ्या नजरेत...
हरवतो कधी स्पर्शात तुझ्या
कधी हरवतो तुझ्या स्वप्नात..

कधी केसांच्या लटा तुझ्या
चेहर्यावरी रुळणार्‍या...
कधी आठवती ओठ तुझे
कधी अंगुळ्या त्या थरथरणार्‍या..

पाहतो तुला कधी निरखून मी
अन् हरवतो मग क्षणात
कधी गुंततो तुझ्या असण्यात कधी..
कधी हरवतो तू नसण्यात...

बुधवार, १५ जून, २०११

आणि मी कविता लिहायला घेतो..

बाप रे..... .......
म्हणजे खूप चिडलेली आहे ही..
ह्म... म्हणजे काहीतरी खास करावे लागणार...
काय करावे रे मना.. तिला मनवण्यासाठी?
तारे आणायचे तोडून?..... तारे...
काहीतरीच.. जुने झाले रे .. चंद्र तारे ...
मग.. गुलाब किंवा फुलांचा गुच्छ...???
ह्म... पण तो एका दिवसात कोमेजून जाणार...
त्यात तिला आवडत नाही गुलाब...
आता बोल.. काय करायचे?...
काहीतरी अगदी खास करावे लागेल..
चाल.. एक छानसे गिफ्ट आणू तिच्यासाठी..
पण.. खूप वेळ लागेल..
त्यापेक्षा.. एक झक्कास आयडिया आहे..
एक कविताच करूयात दोघे मिळून
तिच्यासाठी..
चालेल... कविताच करूयात...
अरे पण तिला तर कविता आवडत नाही ना..
आवडेल रे.. नक्की आवडेल.. मनापासून लिहितोय ना आपण..
मग नक्कीच आवडेल..
चाल.. कविताच करू.. ..
(आणि मी कविता लिहायला घेतो.. )

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

कधीवर चालायचे???

पौर्णिमेचा चंद्र पाहुनि केवळ..
कधीवर मी झुरायचे?

गोजिर्‍या मुखड्यास कधीवर...
चंद्रबिंबात शोधायचे?

अमावस्येच्या रात्रीपरि
अंधारास मी पाहायचे...

चांदण्यांच्या वाकुल्यांना
शांततेने सहायचे..

सखे, हे असे सारे, सांग मजला...
कधीवर गं चालायचे???

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

तुझ्यासाठीच केवळ...

सखे.. तुझ्यासाठी मेळवेन
मी अवकाश धुलीला.
तुझ्यासाठी नमवेन
मी या सार्‍या जगाला..
सांगशील तू तर सूर्यास विझवेन...
तुझी उशी बनवण्या चंद्रासही आणेन...
तुझ्या हाकेवर केवळ मी
उभा जन्म वाहीन...
तुझ्यासाठीच केवळ...
पुन्हा पुन्हा जन्म घेईन...

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

तिची तक्रार.. त्याचे उत्तर...

तिची तक्रार..

तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..

आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...

कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..

त्याचे उत्तर...

मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..

साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..

आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..


म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..

शुक्रवार, ९ जुलै, २०१०

"संवाद"... तो व्हायला हवाय...

तडा गेला तो गेलाच...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....

तिचे म्हणणे एकच... 
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...

त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...

दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०


कविता करताना जेव्हा शब्द सुचत नाहीत तिला... 
करिता मी त्यावर कविता एखादी...
म्हणते माझे सारे शब्दही साथ तुला देती..
मज एकटी करून जाती..
का असे ते वागती मजपाशी
प्रयत्न करते मी किती..
त्यांना सजवन्याचे, फुलवण्याचे   ..
सोबत त्यांच्या कोण्या एका स्वप्नांच्या गावी जाण्याचे..
तरीही का रे जमत नाही मज..
तुझ्या सारखी कविता..
सांगतो तिला मग
सखे, शब्द केवळ आहेत माझे..
भाव मात्र नेहमी तुझे मग..
का बोल राग तुझा कश्याकरिता?

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

तो : मी चिडलोय..
ती : चालणार नाही...
तो : का बरं?
ती : तो हक्क फक्त मला आहे.. तुला नाही..
तो : असे कुठे लिहून ठेवलय?
ती : नासू दे.. पण मी ठरवलाय ?
तो : हे मात्र बरोबर नाही.. तू चुकलिस तर मी चिदयाचा नाही?
ती : नाही..
तो : का ?
ती : कारण मी कधी चुकताच नाही..
तो : आता हे कोणी सांगितलं ?
ती : हे सुद्धा मीच ठरवलं....
तो : सगळं बरं तूच ठरवतेस ?
ती : हक्कच आहे माझा...
तो : आयला... म्हणजे.. सगळे हक्क तुलाच??
ती : असच काही नाही... तुला हवे ते तू कर.. माझ्यावर प्रेम कर.. मला खुश कर.. असाच सतत हसत राहा.. वगैरे वगैरे..
तो : ..... (काय बोलणार?? )

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

ह्म... हा झाला नेहमी चा प्रसंग..
तो म्हणतो : थांब ना..
ती : काही काम आहे??
तो : असायलाच पाहिजे??
ती : तसे नाही रे.. पण उशीर झालाय आता.. .
तो : ... उशीर झालाय म्हणे.. .आत्ताच तर आली होतीस...
ती : अरे पण...
तो : ठीक आहे बाई.. जा ...
ती : नको.. थांबते..
तो : जा की बाई..आता


(गंमत : भूमिका.. दोघांच्या.. क्षणात कश्या विरुद्ध झाल्या??? ) 

बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

ती आणि तो... यांचा संवाद

ती - तुझं माझ्यावर प्रेमच नाही... माझ्याबद्दल तुला काही वाटतच नाही...
तो - असे तुला का वाटते? तुझ्याकडे माझे लक्ष नसते....
ती - तुला आठवतय? आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी हीच पर्स आणली होती??
तो - आणली होतीस .. बहुतेक... माझ्या नाही लक्षात...
ती - आणि आपण याच हॉटेलच्या त्या कोपर्‍यातल्या टेबल वर बसलो होतो??
तो - हो बहुदा.. तेच टेबल होते.. कॅया ग ?
ती - बघ.. तुला नीट आठवत ही नाही.. म्हणून म्हणते.. माझ्या बद्दल तुला काहीच वाटत नाही..
तो - अस कस म्हणतेस तू?? आग मी काय टाइम टेबल करून ठेवलाय???
ती - मग काय मी करून ठेवलाय??? तरी माझ्या लक्षात आहे ना?? मी विसरले नाहीच ना...
तो - बर बाई याच्यापुढे तू सांगशील ते ऐकीन.. आपल्यातली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवीन.. मग तर झाले? मग सांग राणी काय करायच??
ती - तुला कस रे काळात नाही... मला आत्ता काय हवाय तेही तुला समजत नाही??
तो -अग पण तू सांगशील तर कळेल ना...
ती - अस अजिबात चालणार नाही.. तूच सगळ ओळखायला हव... मझ मन तुला समजायला हव...
(आता काय बोलणार बिचारा... थोडावेळ शांतच राहिला... )
ती -ठीक आहे तू म्ानशील तस...
तो -(आत्ता कस.. .)

***************************************************************************