कधी कधी यायलाच हवी
आठवण आपल्या गावाची..
पारावरच्या हनुमंताची नि
देवळातल्या महादेवाची
शहरात करताना चाकरी...
दिसावे डोळ्यासमोर ते कौलारू घर..
जिथे मिळायची चटणी-भाकरी
विनवायची आजी जेवून घे लौकर..
कालवा, नदी, आणि कधी तलाव तो..
भरायचा संध्याकाळी सवंगड्यांनी...
दणानून जायचा परिसर
एकमेकांच्या हाका - आरोळ्यानी
आठवावी शाळा चाळवजा ती
जिथे खाल्ली होती कधी छडी
आठवावी कधी पळून जाताना
खिडकीतून घेतलेली उडी..
कधी आठवावी एखादी
सखी लहानपणीची..
आठवावी भाण्डणे ती लुटूपुटूची
अन्... आठवावी छुपी भेट आपली नि तिची..
आठवावी हाक आईची...
ताईची.. सवंगड्यांची.. गाव सोडतानाची...
अशानेच राहते ओढ कायम...
आपल्या मायभूमीची...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा