केवळ मी.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
केवळ मी.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ मार्च, २०१२

मी... "मनस्वी"

मी लिहीत जातो शब्द
भाव दाटतात मनी जेव्हा
फिकीर नसते मजला
यमकांच्या जुळण्याची तेव्हा

मी मांडत जातो स्वप्ने
जी दिसती मज डोळ्यांना
मृगजळच केवळ सारी
वाटुदेत मग ती कोणा

जे मनास माझ्या वाटे
मी तसाच व्यक्त होतो
म्हणून तर मी आता
माझे नाव "मनस्वी" घेतो

बुधवार, १५ जून, २०११

मी...

मी...
गडगडनारा मेघ मी...
कडाडनारी वीज मी..
पानावरला थेंब मी... अंकुरणारे बीज मी...
उधाणलेला वारा मी...
टपटपणार्‍या गारा मी...
खळखलणारा झराही मी... अन्... जलप्रपाती धारा मी...
सुगंधलेली धरती मी...
समुद्राची भरती मी....
गढुळलेला पूर मी... अन्... घाबरलेला उरही मी...
दुथडी वाहति नदिहि मी...
हिरवीगार वादी मी..
बळीराजाचा आनंद मी... अन्... गिरीवेड्यांचा छन्दमी...

निसर्गाचा उद्घोष मी.... सह्याद्रीतला पाउस मी...

स्वभावच तो...

मी काय करतो,
मुळात मलाच समजत नाही.. जेव्हा
समजून घ्यायचे तेव्हा जगही समजून घेत नाही..
नंतर मात्र म्हणतात सगळे..
काय करतोस?, असा का वागतोस..?
तेच समजत नाही..
पण काय करू..
स्वभावच तो... काही केल्या...
बदलतच नाही..

गुरुवार, ८ जुलै, २०१०

क्षणाचाच मी...

क्षणात हिरवा.. क्षणात पिवळा..
क्षणात होतो मी कधी गहिरा..
क्षणाचाच तो विलंब केवळ..
क्षणात उदास मी.. क्षणात हसरा..

क्षणाक्षणाला बदलत जातो..
क्षणात ऋतूही मागे पडतो...
क्षणात कधी मी इतका बदलतो..
क्षणातच ऋतूला पुन्हा गाठतो...

क्षणच काय तो मजसोबत पळतो..
क्षणाबरोबर मी ही पळतो..
क्षणाचाच मी... क्षणही माझा...
कधी तो क्षणही मजवर जळतो...