गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

कविता.. चंद्र-चांदण्यांची

सखी माझी अशीच वागते..
मनात आले की कविता कर, असं म्हणते..
मला माहीत असतं..
कवितेत तिला काय हवं असतं..
पण, दरवेळी तिला हवं ते देणं
वाटतं तितकं सोपं नसतं..
कधी जमते मला कविता..
कधी नवी नक्षत्रे दिसतात
कधी पुन्हा त्याच चांदण्या दिसतात...
कधी चंद्र भासतो नवासा...
कधी जुनाच चंद्र वाटतो हवासा
पण प्रत्येकवेळी नवे शब्द
जुळून येतात असं नाही
तरीही सखी ऐकत राहते..
कवितेचं कौतुक करत राहते..
कारण, आवड आहे तिला
आकाशात बघत राहण्याची
म्हणूनच बहुदा..
तिला नेहमीच आवडते
कविता.. चंद्र-चांदण्यांची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा