कविता... कवितेवरची.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता... कवितेवरची.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ जुलै, २०१२


शब्दांना काय...
त्यांना कोणीतरी हवंच असतं...
त्यांना व्यक्त करणारं..
स्वतःच्या मनातल्या भावना..
त्यांच्या सोबतीनं मांडणारं...

आपण फक्त स्वतःहून
चार पावलं पुढं व्हावं..
शब्द निवडतातच आपल्याला..
मग आपण त्यांना घेऊन..
त्यांच्याशी खेळून...
असंच पुढे चालत जावं. .

शब्दांना मग आठवण राहते..
आपल्या सोबतीतल्या गमतीची... .
मग ते शोधत राहतात..
आपल्याला..
बनवायला.. वाट.. व्यक्त होण्याची...

सोमवार, २७ जून, २०११

कविता का करायची?

कविता करायची नसते
जिंकण्यासाठी
किंवा हरण्यासाठी,

कविता करायची नसते
कोणाला काही सांगण्यासाठी,
किंवा काही विचारण्यासाठी,

कविता करायची नसते
कोणालाही मार्ग दाखवण्यासाठी
किंवा मार्ग शोधण्यासाठी

कविता करायची असते
ती केवळ व्यक्त होण्यासाठी
मनातले भाव मूर्त रूपात आणण्यासाठी..


वाचणार्‍याने ठरवायचे असते
कवितेत काही आहे की नाही
त्यानेच ठरवायचे असते
त्यातून काही घ्यायचे की नाही

पण, वाचकाने काहीही ठरवले
तरी एक मात्र विसरायचा नाही
कविता कशी का असेना,
व्यक्त होणे थांबवायचं नाही...

बुधवार, १५ जून, २०११

आणि मी कविता लिहायला घेतो..

बाप रे..... .......
म्हणजे खूप चिडलेली आहे ही..
ह्म... म्हणजे काहीतरी खास करावे लागणार...
काय करावे रे मना.. तिला मनवण्यासाठी?
तारे आणायचे तोडून?..... तारे...
काहीतरीच.. जुने झाले रे .. चंद्र तारे ...
मग.. गुलाब किंवा फुलांचा गुच्छ...???
ह्म... पण तो एका दिवसात कोमेजून जाणार...
त्यात तिला आवडत नाही गुलाब...
आता बोल.. काय करायचे?...
काहीतरी अगदी खास करावे लागेल..
चाल.. एक छानसे गिफ्ट आणू तिच्यासाठी..
पण.. खूप वेळ लागेल..
त्यापेक्षा.. एक झक्कास आयडिया आहे..
एक कविताच करूयात दोघे मिळून
तिच्यासाठी..
चालेल... कविताच करूयात...
अरे पण तिला तर कविता आवडत नाही ना..
आवडेल रे.. नक्की आवडेल.. मनापासून लिहितोय ना आपण..
मग नक्कीच आवडेल..
चाल.. कविताच करू.. ..
(आणि मी कविता लिहायला घेतो.. )

माझ्या शब्दांच्या खातर..

मित्रांनो...
शब्द काही नाचत नाही मी म्हणेल तसे..
इतकेच की.. कधी कधी..
माझ्या विनंतीवरुन ..
माझी मदत करायला येतात ते..
अगदी गरज पडेल तेव्हा..
कोणाला हसवायला.. कोणाला रडवायला...
कोणी रूसल्यावर त्याला फुलवायला ...
माझी अशी मदत लागताच नाही त्यांना..
तेच करून जातात त्यांना हवे ते..
ते सांगून जातात ...
जे मला म्हणायचे ते..
पण लोक मात्र उगीचच मला श्रेय देतात..
पण.. माझ्या शब्दांच्या खातर..
त्यांच्या माझ्या मैत्रिखातर..
मी झालेले कौतुक स्वीकारत राहतो..
आणि माझ्या मित्रांना..
शब्दांना घेऊन..
नेहमीच सगळ्यांच्या भेटीला येत राहतो..

मी कविता केली...

कविता मी केली होती...
ती येण्याआधी.. ती आली तेव्हा..
ती होती तेव्हा.. अन् ती गेली तेव्हा..

कविता मी केली होती..
मी आनंदी असताना.. काही स्वप्न पाहताना..
काही स्वप्न मोडताना.. अन् त्यामुळेच निराश होताना..

कविता मी केली होती..
पावसात भिजताना... उन्हात होर्पलताना..
थंडीत कूड्कडताना अन् वारा शोंबतना..

कविता केली होती मी
तेव्हाही, जेव्हा चंद्र रात्रभर हसला..
तेव्हाही जेव्हा.. सूर्य ढगांमधे हरवला..
अं जेव्हा... हे दोघेही नव्हते तेव्हा..

कविता केली मी..
अगदी निराश झालेल्या एका युवावर..
शब्दांवर राज्य करणार्‍या कविवर...
प्रेमात पडलेल्या युवतीवर ही...


पण कविता, शब्द, यमक...
यांनीच दिली मला साथ..
त्यातून मांडले मी विषय जे...
त्यातून उलगडले विश्व जायांचे..
त्यांची साथ कधी मिळालीच नाही...

तेव्हा मी कविता केली...
माझ्यावरच... ती होती... मौनाची....
असेच होते..
कोणी काही बोलते आणि
मला... ती आठवते...
मग माझ्या मनातली कविता
हळूच कागदावर उतरते..
ती कोण म्हणून विचारता
मला काहीच सांगता येत नाही...
ती कुठे कशी कोण
मलाही ठाऊक नाही..

स्मरते मज कविता...

प्रेरणा मिळते मला
कवितेची तिच्या रुपातुनि
प्रेमात बुडता तिच्या मी
होती कविता प्रत्येक क्षणी...

होते कविता हास्याची तिच्या
होते कधी तिच्या रुसन्यातुनी
दिसते कविता तिच्या नेत्रातुन
कधी सापडते तिच्या पाउलखुणातुनी...

तिच्या अश्रूंच्या धारांतूनही
पाझरते कविता
ती नसता तिच्या आठवणीताही
स्मरते मज कविता...

गोष्टी... नाव असलेल्या... नसलेल्या...

कधी कधी नाही सुचत..
कवितेसाठी नाव..
पण, म्हणून कमी होत नाही
कवितेमधला भाव..

प्रत्येक गोष्टीस नाव हवे..
म्हणजे ती ओळखता येते...
परंतु, म्हणून काही निनावी गोष्ट...
केवळ अनोळखी होते?

निणाविच खरी..
पण सौंदर्य तर तेच असते...
नाव नसल्याचा फायदा असा...
की ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते..

कारण, नाव असलेल्या गोष्टी....
सांगता येतात दुसर्‍यांना..
नाव नसलेल्या मात्र..
अनुभवावयाच लागतात स्वतःला...

मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवीने जगायचे... वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीने लिहायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्‍म्यातून

कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..

कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

कंटाळा येतो ना..

कंटाळा येतो ना.. मला..
तेव्हा मी कविता लिहितो...
चार.. ओळींची.. नाही म्हणजे तसे मी ठरवतो..
की लिहुयात काहीतरी लांबलचक.. वेळ जाईल निघून..
मग मी लिहु लागल्यावर हलू हलू माझा उत्साह संपत संपत कविता ही संपते..
आणि मग ती राहते.. फक्त चार.. ओळींची नव्हे..
शब्दांची..
मग उगीच तिला शेपटी लावतमी तिला लांब करत नेण्याचा प्रयत्न करतो..
हनुमानाच्या शेपटीएवढी कविता लिहीण्याचा संकल्प..
त्याच शेपटी ला कापड गुंडालणार्‍यांच्या उठशाहासारखा कमी होतो..
आणि मी अर्ध्यातच शेपटी पेटवून देतो..
काय?
शेपटी पेटवतो? कोण?
मी.. कविता सम्पवतो..
आणि मग मला कळते.. की शेपूट कुठली..
वेळ जावा म्हणून नकळतच मी थंडीत.. (म्हणजे ए सी च्या)
शेकोटी मिळावी म्हणून कविताच पेटवून दिलेली असते..
त्या कागदाची राख गोळा करायची ही इच्छा नसते..
मग मी त्या राखेवरच दुसरी कविता लिहीत लिहीत..
कधीतरी झोपी जातो..

कविता मी आणतो..

कविता मी आणतो.. त्या गावाहून..
जिथे सापडतो स्वप्नसडा... रोज रातीला..
भेटतो जिथे रवि.. किरणांना...
अन् चंद्र चांदन्यांना..

भेटती जिथे भाव मनीचे सारे...
जणू आकाशातील तारे..
नसे जिथे कल्पनेस बंध..
दर वळतो जिथे रातरानी सुगंध..

परतत असता भेटती शब्द
म्हणती येतो सोबतीला...
जाती देऊन जाता जाता..
अर्थ माझ्या कवितेला..

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मी.... केवळ.. निमित्तमात्र...

शब्दांना व्यक्त व्हायचं असतं...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्‍यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...

अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..

सुरुवातीला होते अडचण..
शब्दरचना करताना...
खूप कष्ट घ्यावे लागतात
शब्दांचे यमक जुळवताना...

कधी कधी जमते सारे..
कधी फजितिही होते...
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
मग कविता लिहीणे जमू लागते..

शब्दांनाही जाणवते मग
आपल्या मनी भाव आहे...
कधी आज कधी उद्या..
तर कधी.. आठवणींचा गाव आहे..

शब्दच मग येऊ लागतात
सदैव आपल्या मदतीला...
पाहता पाहता सजवून जातात
आपल्या मनीच्या कवितेला...

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

हे.. असेच चालायचे..

शब्दाला शब्द जोडायचा...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...

मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्‍याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...

म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..

पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

शब्दांचीच कविता होते...

शब्दांचीच कविता होते..
कवितेचे गाणे होते...
आणि एकदा गाणे झाले की ..
सतत.. भावांच्या गावी..
जाणे येणे होते..

भाव मनी दाटता. .
शब्दरूपाने बरसात येतो..
स्वर लाभता तयाला..
भाव नव्याने बरसतो ..
मनास सार्‍या भिजवून जातो
गावी स्वप्नाच्या घेऊन जातो..

म्हणून लिहिली मी कविता....

रंग... कसे दिसतात? कसे दिसणार मला?
डोळे कसे.. दिपतात? कसे... ते कसे कळणार मला?
पण जाणवते मज.. हळूवार झुळुक...
ऐकू येतो मज.. थेंब.. टूपुक...
समजते मला.. वार्याची भाषा
कळतात मज कोकिलेचे सूर.. न
पावसाची आशा..
म्हणून लिहिली मी कविता जाणीवेवर..
मात करून माझ्या.. अंधारावर..

शनिवार, ३० जानेवारी, २०१०

एकदा भेटली मला... माझीच एक कविता...

एकदा भेटली मला...
माझीच एक कविता...
म्हणाली.... किती दुष्ट आहेस रे तू?
प्रत्येकवेळी मला तिच्या हवाली करतोस...
तिचे मन जिंकतोस आणि तिलाच मिठीत घेतोस...

म्हटले.... मला नाही समजले...
कविता तिच्यासाठीच तर होती ना?
मग तिलाच देणार ना?

तर म्हणते कशी....
इतक्यावेळा तू माझ्या मदतीने
तिला खुश केलंस...
प्रत्येकवेळी मी ही जाउन..
तुझ्या मनातलं सारं...
मी तिच्यासमोर व्यक्त केलं...
आणि त्याच मनातल्या गोष्टींनी..
तिनेही तुला आपलंसं केलं...

हे सारे होण्यासाठी तू मला किती सजवलंस...
प्रत्येकवेळी मला एक नवं नि सुंदर रूप दिलंस...

पण.... प्रेम मात्र फक्त तिच्यावरच केलंस...

..... म्हणून... दुसरे काय...?

कविता वाचून ती म्हणाली..
किती किती भारी ते शब्द..
मी म्हटले..
भारी नाही.. इथलेच आहेत..
आपल्याच आसपासचे..अगदी रोजचे..
मी थोडे धुवून साफ करून घेतले..
व्यवस्थित कवितेच्या मांडणीत लावले..
म्हणून ते सुरेख दिसताहेत.. दुसरे काय...

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

कविता करायला म्हणे


कविता करायला म्हणे काही खास लागते...
शब्द, भाव आणि मनात कोणाची ओढ लागते..
यमक फक्त जुळले की चालत नाही..
नुसते भाव व्यक्त करूनही चालत नाही..
त्यात असावे लागते प्रेम.. कोणावारही..
अगदी कोणावारही..
त्याच प्रेमाटून येतात भाव.. सापडतात शब्द..
जुळतात यमकं आणि मग होते त्याची कविता..

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

एकदा का मनाला पंख फुटले
की ते उडायला लागतं...
अगदी कल्पनेच्या जगातल्या
कोणत्याही कोपर्‍यात नेऊन
आपल्याला सोडायला लागतं..
आणि मग तेथून परत येताना
तेच काही शब्द देऊन जातं...
प्रत्येक शब्द बसू शकेल अशी
एक छानशी यमकाची पेटी देऊन जातं..
आपण फक्त प्रत्येक शब्द
त्या त्या चौकटीत बसवयचा..
की त्याची होते एक सुंदरशी कविता...