कवीने लिहायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्म्यातून
कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..
कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..
कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा