तडा गेला तो गेलाच...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....
तिचे म्हणणे एकच...
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...
त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...
दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा