असेच काहीतरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
असेच काहीतरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ जुलै, २०१२


रात्र... अंधार...
किरर्र.. घनदाट..
त्यातून जाणारी
एक नागमोडी वाट..

धुकंच धुकं सर्वत्र..
ना दिशा.. ना वेळ..
कशाचाच जमेना..
कशाशीही मेळ....

आसपास कोणाची
चाहूल तेवढी येते..
पण, सोबत केवळ..
भीतीच सोडून जाते..

अचानक एक किंकाळी..
मग पुन्हा.. शांतता...
हृदयात वाढणारी धडधड..
अन् मेंदूत सुन्नता..

पुन्हा पुन्हा एकच विचार..
पुढे नक्की होणार काय...
अन् तेवढ्यात जाणवतो..
कशात तरी अडकलेला पाय...

हाच आहे तो शेवट..
खात्री पटलेली असते..
या वेळची किंकाळी..
आपल्याच आतून आलेली असते..


आजचा सूर्य मावळेल..
पुन्हा कधीही न उगवण्यासाठी..
आज रात्र होईल...
पुन्हा कधीही न संपण्यासाठी..

उगवलाच उद्याचा दिवस..
तर, तो केवळ भास असेल..
सारे काही तसेच असेल..
तरीही एक पोकळी असेल..

कोणाला बहुदा समजेलही..
पोकळी झालेली जाणवेलही..
पण त्यामागचे कारण काय..
हे शोधायचाही वेळ नसेल..

पुन्हा काही नवीन घडेल..
पोकळी नकळत भरून जाईल..
जुने मात्र पुन्हा एकदा..
नेहमीप्रमाणे.. विस्मरणात जाईल..

मंगळवार, २९ मे, २०१२

देशहितार्थ


कोणी म्हणतो शिवराय मोठा..
कोणी म्हणे माझा भिम मोठा
कोणासाठी फुलेच महात्मा
कोणासाठी शाहूच मोठा

कोणी स्वातंत्र्यवीरास नमितो..
कोणी महात्मा गांधीस मानतो..
कोणासही मानणारा असो तो..
दुसर्‍यास मात्र तुच्छ जाणतो..

प्रत्येकाचे दैवत मोठे..
दुसरे कुणी ठावेच नाही..
अश्या परिस्थिती या भारताचे..
भाग्य उजळणे शक्यच नाही...

उपाय यावर एकच आहे..
प्रत्येकाने स्वीकारण्याचा
जात-धर्म अन् पंथ सोडूनि
देशहितार्थ विचार करण्याचा...

शुक्रवार, २५ मे, २०१२


एक वाहता निर्झर
किरर्रता भयाण सोबती
पाचोळ्यात होई सळसळ..
अन् एक किंकाळी... अजाणती

कोणास लपवतो आडोसा
कोणाचे हास्य ते भेसूर...
वणवा लागतो कुठेसा..
आसमंती दाटला धूर...

झाकोळला तो सूर्य...
अंधार दाटूनी येतो..
उरातले चोरूनी धैर्य..
केवळ भीतीच देऊनी जातो..

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

कित्येक वेळा जन्मभर
उभा असतो वृक्ष...
वाट पाहतो पावसाची...
जरी होऊन जातो रूक्ष..

पाउस काही पडत नाही..
पालवी काही फुटत नाही..
शेवटी गळून पडतो धरेवर...
पण त्याची इच्छा पुरी होत नाही..

नंतर कधीतरी येतो पाउस..
मग त्या खोडात पालवी फुटते..
पण अश्या वेळी त्या वृक्षाला..
खरेच... कसले सुख मिळते?

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

मी.. प्रवासी.. खिन्न रात्रीचा

काळोख्या खिन्न रात्रीचा
एक प्रवासी मी..
किर्रतेच्या सहवसातील..
एक निवासी मी...

कधी शहारुन येते एकांती
कधी उरात भीती दाटते,
अस्तित्व क्षणाचे माझे,
संपणार... कधी वाटते...

यत्न करिता पळण्याचा..
रात्र जखडूनी ठेवते...
आता सुटका केवळ मृत्यू
जाणीव होत राहते....

शून्य

विश्व एक शून्य...
शून्यातला मी एक...
शुन्यालाच अर्पिलेला..
क्षण माझा प्रत्येक...

लढत राहतो अस्तित्वाशी..
पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी..
झुगारूनी सृष्टीचे नियम सारे..
शून्याची वृद्धी करण्यासाठी..

शून्य पाहता वाटे नगण्य...
परि असे तो सर्वस्व अनंत...
सुरवात विश्वाची शून्याशी होते..
त्यातच होतो... विश्वाचा अंत..

बुधवार, १५ जून, २०११

गोष्टी... छोट्या... मोठ्या...

वार्‍याची एक झुळुक..
घामाने थबथबल्यावर..

पारावरची सावली..
उन्हात फिरून आल्यावर..

थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..

परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..

अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..काही ना काही घडल्यावर..

अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..

इतका.. की विषाहुनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात.

ग्रहण..

काल रात्री ग्रहण लागले.. चंद्राला..
पौर्णिमेचा चंद्र अचानक...
अंधाराने खाउन टाकला..
ग्रहण काही साधे नाही खग्रास ग्रहण..
अंधार झाला...
अगदी भयाण अंधार..
खूप दिवसात असा अंधार पहिला नव्हता...

चंद्र तसा रोजचाच
पण त्याला एक वेगळे तेज आले होते..
दिसामजी चंद्र अगदी शुभ्र होत जात होता..
कधीही नव्हता इतका ...
शुभ्र...
प्रेमात पडलेल्यांच्या पवित्र नात्यांनीच जणू
त्याला नवे तेज दिले होते..
पण कालची रात्रच काही और होती..
त्या प्रेमभावनेवरच कोणी घातला होता घाला..
आणि त्याच वेळी अचानक...
हळू हळू..
चंद्र लहान लहान होत गेला..
अंधार...
काळाकुट्ट अंधार..
कदाचित ग्रहण सुटेलही..
पण..
चंद्राला त्याचे ते शुभ्र तेज...
पुन्हा मिळेल??

चाहूल

चाहूल कोणाची येता...
कोणी होते कावरे बावरे...
येता सामोरी असे कोणी...
मन वेडे.. होते घाबरे...

कधी येता चाहूल कोणाची..
भरतो मनी अतीराग...
येता सामोरी कोणी असे..
मस्तकी.... तळपायाची आग...

चाहूल असे ती एकचि...
प्रतिसाद मात्र निराळे..
प्रत्येक वेळी येती..
मनी तरंग वेगवेगळे.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

कुंपण...

प्रत्येक मनाला
एक काटेरी कुंपण असतं...
ते कधी ओलांडता येत नाही ...
मन कुठेही गेलं
तरी कुंपण त्याला सोडत नाही..
मनाला ते सांगत राहतं..
मर्यादा त्याची दाखवत राहतं..
पण, मन मात्र ऐकत नाही..
कुंपणाकडे पहात नाही..
कुंपण मग ईरेला पेटतं..
मनाला उडूच देत नाही..
कधी मन, कुंपण तोडतं... उंच उडतं....
मग त्याला वाटू लागतं..
की, कुंपणाशिवाय जगता येतं..
पण, त्याहून शहाणं असतं...
हळूच मनाच्या नकळत..
मनाला नव्यानं मिठीत घेतं...

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

मोठं ध्येय गाठण्यासाठी...

फुलपाखरू...
किती सुंदर, किती नाजूक...
अगदी अलगद हळूवार उडणारे..
कितीतरी इतर पाखरांसोबत..
स्वछन्दी आयुष्य जगणारे...
पण तरीही सतत
एकाच मर्यादेत राहणारे..
तीच साथ, तोच परिसर...
जीवनसुद्धा अगदी...
काही दिसभर...
म्हणूनच कदाचित..
आपल्याला फुलपाखरू व्हावंसं वाटतं...
मनाप्रमाणे उडत राहून..
केवळ आनंदी राहावं वाटतं...
पण, त्या नादात विसरतो आपण..
उंच उडायला फुलपाखरू नव्हे..
तर, गरूड व्हावं लागतं..
मोठं ध्येय गाठण्यासाठी...
पंखांमध्ये मोठं बळ असावं लागतं..

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

एक ....

एक घाव...
मनावरचा..
एक धार...
रक्ताची... लाल रंगाची..
एक शब्द...
शेवटचा...
एक आरोळी...
मनातली.. मनाची
एक क्षण..
शेवटचा..
एक प्रश्न...
आयुष्याचा.. मरणाचा..

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

भूतकाळ येतो... आणि ...

एक दिवस अचानक समोर येतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्‍या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्‍या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

विचारांचा पाउस...

विचारच करत होतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?

आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?

विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?

विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...

गुरुवार, १ जुलै, २०१०

गूढ.. अगम्य... केवळ सावली...

निशब्द.. शांतता...
कशाचही आवाज नाही...
आस-पास कोणी ही नाही...
केवळ... निशब्द शांतता..

त्यातून येणारा एक आवाज..
घुंगरांचा... मधुर...
अगदी काळजाला भिडणारा...
त्या निशब्द शांततेला...
मधूनच चिरणारा....

मागून येणारी सावली...
कोण्या अद्न्यात व्यक्तीची...
कोणाची? माहीत नाही...
केवळ सावलीच ती...

भविष्यात होणार्‍या एखाद्या
अघटीताची तर नाही?
कोण जाणे...
पण.. सावली दिसतीये खरी..
गूढ.. अगम्य... केवळ सावली...

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

काही ना काही घडल्यावर..

वार्याची एक झुळुक..
घामाने थबथबल्यावर..
पारावरची सावळी..
उन्हात फिरून आल्यावर..
थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..
परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..

अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..
काही ना काही घडल्यावर..
अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..
इतका की विशाहूनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात..

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

आणि पुन्हा कामाला लागतो..

कधी चांदण्या पहिल्यात....
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..

बुधवार, २० जानेवारी, २०१०

कवितांच्या मैफलीत माझ्या

 कवितांच्या मैफलीत माझ्या
केवळ प्रेम स्वप्नेच नव्हती..
होते थोडे दुःखही विरहाचे
थोडी वास्तवताही होती...

नव्हत्या केवळ आणाभाका
किंवा  नव्हत्या केवळ राती...
होत्या मातितल्या भेगा
अन् होती काही नाती...

मैफल होती परिपूर्ण परि..
ऐकण्यास कोणी नव्हते...
मी नि कविता दोघे संपलो.. परि..
पाहण्यास कोणी नव्हते...
_____________ViNnY_____

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

आयुष्यात खूप काही अगदी
मिळाल्यासारखे वाटते
पण त्याच वेळी नेमके आयुष्यावर
अनिश्चिततेचे सावट दाटते..
ते इतके गहिरे होत जाते
की आपण सार्‍याच आशा सोडून बसतो..
आणि आपल्या सर्वात आवडत्या गोष्टीही गमावून बसतो..
तोच क्षण महत्वाचा असतो प्रत्येकसाठी..
आपले आयुष्य ताकदिनिशि
भांडून परत मिळवण्यासाठी..
इथे जर हारलो तर मात्र आयुष्य संपून जाते..
अन् जिंकलो तर मात्र आपण
ध्रुवाप्रमाणे अगदी नभात सर्वोच शिखरावर जाउन बसतो