कधी चांदण्या पहिल्यात....
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा