सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

ओर्कुटवर झालेली मैत्री
कधी वाढत गेली,
कळलेच नाही त्या दोघांना..
मैत्रीचे प्रेम कधी झाले
समजलेच नाही त्यांना..
प्रेमात पडले होते खरे दोघे..
भेटले मात्र नव्हते कधीच...
आयुष्यभराच्या आणा-भाका मात्र
झाल्या होत्या आधीच...
कधी स्क्रॅप, कधी ईमेल
कधी कॉल करून बोलणे..
एकमेकांना चिडवणे..
एकमेकांसाठी झूरणे...
ऑनलाइन भेट नाही झाली
तर रुसणे तर कधी भाण्डणे..
मग आला दिवस प्रेमाचा...
ठरला बेत भेटिचा..
जागा ठरली... वेळ ठरली..
दोघे अगदी आतुरतेने भेटले...
इतके दिवस प्रेमात असूनही..
आज खरे मिलन झाले..
इतके सारे होऊनसूद्धा
काहीतरी वेगळे होते..
भेटीत दोघांच्या गप्पा सोडून
बाकी सारे जमले होते..
एकमेकांना समोर पाहून
आनंद गगनात मावत नव्हता...
पण... नेमके काय बोलावे
याला विषयच मिळत नव्हता..
एकमेकांची चौकशी झाली
पुढे काहीच होत नव्हते..
एकमेकांना पाहून हसण्याखेरीज...
दोघांना काहीच जमत नव्हते...
दुसर्या दिवशी पुन्हा
दोघे ऑनलाइन भेटले...
एकमेकांची माफी मागून
पुन्हा गप्पांमध्ये गुंतले..
---------------------------------
थोडक्यात काय...
माने आलियेत जवळ...
साधने झालीयेत अफाट...
सभाषणाला मिळालाय वेगसुद्धा सुसाट..
पण इतके सारे होऊनही...
एक मात्र कमी आहे..
प्रत्यक्षात भेटनार्‍या माणसातले...
अंतर मात्र वाढत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा