सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

... आणखी एक रात्र....

तिची आठवण तर येते खूप..
वाटते आत्ता जाउन भेटावे...
पण उगाच ती झोपलि असेल..
स्वप्नांच्या दुनियेत रमलि असेल.. तर?
का तिला.. उठवावे?
पण मग हळूच मी तिच्या स्वप्नात शिरतो..
उगाच..
तिची खोडी काढायला..
ती मस्त चांदण्यात फिरत असताना
मी तसाच तिला निरखत राहतो..
ती इतकी सुंदर भासु लागते..
की मी खोडीसुद्धा विसरतो..
असाच तिला बघत असताना
अचानक ती समोर येते..
म्हणते...
"ए वेड्या... उठ की आता..
सकाळ झाली बघ...
कुठल्या स्वप्नात रमलायेस असा..?"
उठून पाहतो तर...
खरेच सकाळ झालेली असते...
आणखी एक रात्र तिच्या स्वप्नात संपलेली असते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा