असाच एकांती बसलो होतो..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा