शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

जगावं ... कुणासारखं?

कधी वाटतं जगावं... पक्ष्यांसारखं
पंख पसरून फिरावं स्वछन्दि
राज्य करावं आकाशावर
कुठंही विचरण्यास नसावी बंदी

कधी वाटतं जगावं... माश्यासारखं
खोल खोल पोहत जावं
सागराच्या तळाशी राहावं
आणखी खोल जाताना, अडवणारं कोणी नसावं

कधी वाटतं जगावं... चंद्रासारख
रोज रात्री यावं
कधी मोठं व्हावं, कधी गायब व्हावं
कवींच्या कल्पनेत सतत रहावं

कधी वाटतं जगावं... सूर्यासारखं
सार्‍या जगास प्रकाश द्यावा
दिसामाजी आराम करावा
रोज सार्यांचा नमस्कार घ्यावा

कधी वाटतं जगावं... राजासारखं
आपल्याच धुंदीत राहून
प्रजेला ताब्यात ठेवून
वाटेल तसं राज्य करून
सार्‍या जीवनाचा घ्यावा आनंद

कधी वाटतं जगावं... योग्यासारखं
काही नसून असल्यासारखं
सारं असून नसल्यासारखन
भिकारी असूनही... राजासारखं

शेवटी वाटतं जगावं... आपल्याचसारखं
शरीर इथे.. अं मन कुठे
आपण आले राहून सुद्धा
जाउ शकतो पाहिजे तिथे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा