शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मी.... केवळ.. निमित्तमात्र...

शब्दांना व्यक्त व्हायचं असतं...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्‍यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा