गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...

आली निवडणूक पुन्ह्यांदा...
आणखी एक सुट्टी मिळणार हाय...
माझ्या लेकरा-बाळाला घेऊन
मी सहलीला जाणार हाय...

उभ्या असलेल्या उमेदवारांमधी..
कोणीच निवडायच्या लायकीचा न्हाय
आणि म्हणूनच मला यावेळी बी..
मतदानाला जायचं न्हाय...

असाच विचार करून
निम्म मतदानबी होणार न्हाय
अन्.. शंभरातल्या ७० ला नको असूनबी...
एक उमेदवार निवडून येणार हाय...

एक एक मत विकत घ्यायला
त्यानं बक्कळ पैसा खर्च केलेला हाय..
आणि म्हणूनच तो बिनपैशाची
कोणाचीच कामं करणार न्हाय...

म्हणून सांगतो मंडळी..
मतदान करणं गरजेचं हाय..
कारण, सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
"INDIA"चा भारत होणार न्हाय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा