संवाद... स्वतःशीच... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संवाद... स्वतःशीच... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

कारण असावं असं नाही...
कित्येकदा वाटतं कोणीतरी
असायला हवं होतं सोबत...
अगदी या क्षणापुरतं का होईना...
असं वाटायला लागतं
आणि त्याचवेळी डोळ्यासमोरुन
एक माणसांची रांग पुढे सरकते.
ती जशी पुढे जाऊ लागते,
आपण त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करु लागतो..
सोबत राहण्यासाठी..
दरवेळी कोणीतरी येतं समोर
आणि आपण त्या व्यक्तीच्या विचारात बुडून जातो...
परंतु, कधीतरी एखादी वेळ अशीही येते,
आपण शोधत राहतो ती एक व्यक्ती...
आणि ती सापडतच नाही...
अश्या वेळी आपण
स्वतःच्या आत डोकावून पाहू लागतो..
आणि तेव्हा जाणवतं...
थोडं स्वतःशीच बोलायला हवं कधीतरी..
या क्षणी आपला शोध खऱ्या अर्थाने संपलेला असतो...

#मनस्वी #VinayakVBelose

बुधवार, २५ मार्च, २०१५

मना..

सांगशील का माझ्या मना
तू सैरभैर का व्हावे ऎसे?
सोड ना आता कश्याला
विचार (त्यांचा), ज्यांना जायचे...

का करीशी हट्ट असा तू,
का तुला थांबायचे..
चल पुढे जाऊयात आता..
इथे आपुले न काहीच व्हायचे..

तुझ्याच म्हणण्याप्रमाणे मी
वागलो होतोच ना..
मग आता वेळ तुझी बघ
मी सांगेल ते ऐकायचे...

#मनस्वी
#VinayakVBelose

बुधवार, १५ जून, २०११

उद्देश...

उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून
वेगवेगळा निष्कर्ष निघाला..

कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलंय
मस्तपणे भटकायला..
हवे तसे जगायला..

कधी वाटले..
छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास..
जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला..
त्या शंभुराजाला...
त्या शाहूला..
फुले अन् आंबेडकरांना..

पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून?
खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय?
कोणी दाखवेल का वाट ??

पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल..
कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आणेल
आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...

ऊठ.. आणि तयार हो..

भविष्याच्या ही पुढे..
दिसते का कुणा?
गेलेली ती वेळ ..
परतुनी येते का पुन्हा?

मग..
येणार्‍याची काळजी करत..
गेलेल्याची आठवण काढत..
का जगावे एखाद्याने..
जगण्यासाठी वर्तमान दिलेय ना देणार्‍याने...

तो गेला, अमुक झाले,
थोडा विचार केला असता तर?
भेटेल का ती, होईल का हे..
जर असे झाले तर?

कधी पर्यंत चालणार असे?
जगाने सोडून, विचारात पडून,
का करून घ्यावे हसे?
मला वाटते.. वेळ आलीये..

ऊठ.. आणि तयार हो..
नव्या आव्हानांना तोंड देण्यास सज्ज हो..
विसरून भूत आणि भविष्य
जग वर्तमानाबरोबर..
बदलेल भूतकाळच तुझा..
येणार्‍या भविष्यकाळाबरोबर

वेड...

वेड चांदण्यांचे.. मला नव्हतेच कधी..
होते तर ते त्या चंद्राचे...
जो कधीच उगवला नाही..
मी आकाश न्याहाळताना

वेड नव्हते मला.. त्या गवतफुलांचेही...
होते तर ते त्या गुलाबाचे..
जो कधीच फुलला नाही..
मी बागेत रमताना

वेड तर नव्हतेच मला.. शिपल्यांचे ही..
होते तर ते त्या शंखाचे...
जो सापडलाच नाही कधी...
मी समुद्राकिनारी फिरताना...

वेड तर मला.. गर्दीचेही नव्हते कधी..
होते तर ते.. कोण्या दर्दिचे..
जो मला भेटलाच नाही..
मी जत्रेत शोधताना..
ती.. निघून गेली आणि त्याच्या मनाने त्याला काही सांगितले..

बघ.. सांगितले होते ना तुला..
त्रास देऊ नको तिला...
गेली बघ ती रागावुन...
आता बस आठवण करत तिची ... .
म्हणत बस्स... मी असा का वागलो...
ती पुन्हा भेटली की राग काढेन तिचा..
तिला छान गिफ्ट देईन.. वगैरे वगैरे..
पण आत्तातरि ती निघूनच गेली ना..
आता इतका विचार करून काही होणार नाहीए..
उत.. ती जास्त लांब गेली नसेल..
तिला गाठ आणि आत्ताच तिची
समजूत काढ..
हो.. नाहीतर उगीच नंतर सगळे तानत जाते..
आणि कधी तर नाते तुतायला ही येते..
इतक्या लांबवर जाण्याआधीच तिला सांग..
तुझे तिच्यावर किती प्रेम आहे..
अरे वेड्या तिलाही हेच हवे असेल.. पण
ती काय तुला तसे सांगून जाईल?
जा बघू... लौकर..

(मनाने माझ्याशी घातलेला वाद... )

नकोच होते तू असे वागायला..
नकोच होतेस जीव लावायला..
काय होईल म्हणे जास्तीत जास्त .. पुन्हा तेच लागेल..
अरे पण ती तेच मला लागते..
त्याचे काय?
तुला काय रे.. हवा त्याला जीव लाव..
जसे वाटेल तसे वाग तू..
पण मला सांग उगीच इतकी निर्मल,
निरव्याज माया लावतोस तू..
अगदी सगळ्यांशीच चांगला वागतोस..
सगळ्यांशीच जवळीक साधतोस..
पण नंतर काय होते?
नेमेची येतो मग पावसाळा...
तुझे हे नेहमीचेच झालेय रे..
पण मी तरी किती जखमा झेलायच्या?
बास झाले आता तुझे हे नाटक..
बंद कर आता तुझ्या या सवयी...
किती दिवस चालणार तुझे हे असे?
आणि असेच वागायचे तर सांग तरी...
नाही.. दगडाचे काही गुण आलेत माझ्यात..
सारखीच ठेच लागून... आता अगदी पाषाणच होईन म्हणतो..
मग तू काहीही कर..
मी काहीही बोलणार नाही...

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

उद्देश... माझा.. जीवनाचा..

उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलाय.. मस्तपणे हुन्दडायला...
कधी वाटले.. छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास.. जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला.. त्या शंभुराजाला...
त्या शाहूला.. फुले आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून? खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय? कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल.. कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आनेल आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

संकल्प...

आत्तापर्यंत वागलो तसं...
पुन्हा कधीही वागायचं नाही..
आत्तापर्यंत जगलो तसं...
पुढचं आयुष्य जगायचं नाही..

फक्त पुढेच चालत जायचं..
मागे वळून पाहायचं नाही...
नव्या शिखरांवर आरूढ व्हायचं
एकाच ठिकाणी रमायचं नाही..

नवी स्वप्ने नवा ध्यास...
रोज गाठायचं नवं आकाश..
उंच हवेतला मोकळा श्वास
धरतीकडे पाहताना ठिपक्याचा भास..

इतकं उंच उडत असताना
एक मात्र विसरायचं नाही...
कितीही यश मिळालं तरी..
माणूसपण सोडायचं नाही...

स्वप्न ... मनातल्या साठवणींचे....

असाच एकांती बसलो होतो..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

मोठा तर मी तेव्हाच झालो..
जेव्हा झाली जाणीव..
कोणीतरी असावे लागते,
आयुष्य पूर्ण होण्यासाठी..
पण मग "ती" भेटली..
सारे काही अगदी व्यवस्थित जमले
आणि वाटले आपण मोठे झालो..
थोडक्यात काय,
पुन्हा एकदा वाटले जणू हीच ती वेळ..
आपण मोठे झालो त्याची..
आणि असे वाटत असतानाच
अचानक सारे जगच जणू विरुद्ध उभे ठकल्याची...
तेव्हा पूर्ण ताकदिनशी सामोरा गेलो सर्वांना.. केवळ तिच्यासाठी..
तेव्हा वाटले पुन्हा एकदा .. आपण मोठे झालो..
पण अचानक, एक दिवस 'ती' मला सोडून गेली..
तेव्हा मात्र अगदी लहान मुलासारखा राडलो..
अगदी एकटाच..
पब हलू हलू त्याचीही सवय झाली..
इतकी की कितीही मोठे दुःख आले तरीही दगमगलो नाही..
तेव्हा मात्र खात्री झाली.. मी खरेच मोठे झाल्याची..

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

एक प्रश्न माझ्यातल्या कवीला..


तिच्या आठवणीत मी लिहिल्या कविता..

पण नाही जमलं ती असताना काही..
अगदी थोडं जरी जमलं असतं.. तेव्हा..
आज ती इथे असती..
मग लिहिल्या असत्या तिच्यावरच्याच कविता
अगदी तिच्या समक्ष..
अं केले असते राजी तिला अगदी विश्वंतापर्यंत साथ देण्यासाठी..
पण कदाचित नव्हते नशिबी तिचे माझ्या सोबत रहाणे..
राहिली ही असती ती कदाचित पण..
मग.. खरंच मी कवी झालो असतो??
एक दिवशी एकटाच भटकत होतो..
काहीतरी अजानते शोधत होतो..

ठाऊक नव्हते मलाच माझे
हवे काय होते..
पण तरीही दही दिशाना जाऊन
धडकत होतो..

अचानक वाटले सापडली दिशा..
मी तसाच पुढे गेलो..
पण मृगजळ होते.. पुढेच.. थोडे..
मी तसाच परतही आलो..

कधी कळेना मिळेल दिशा मज..
कधी कळेना सापडेल ध्येय मज..
असाच कधिपर चालत राहू..
उगाच कशा कुणाची वाट पाहु?

वाटते कधी मज संपावे जग
वाटते कधी संपावे जीवन..
प्रवास हा जर संपत नाही.
जगण्यातही उरला राम नाही..