मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

एक दिवशी एकटाच भटकत होतो..
काहीतरी अजानते शोधत होतो..

ठाऊक नव्हते मलाच माझे
हवे काय होते..
पण तरीही दही दिशाना जाऊन
धडकत होतो..

अचानक वाटले सापडली दिशा..
मी तसाच पुढे गेलो..
पण मृगजळ होते.. पुढेच.. थोडे..
मी तसाच परतही आलो..

कधी कळेना मिळेल दिशा मज..
कधी कळेना सापडेल ध्येय मज..
असाच कधिपर चालत राहू..
उगाच कशा कुणाची वाट पाहु?

वाटते कधी मज संपावे जग
वाटते कधी संपावे जीवन..
प्रवास हा जर संपत नाही.
जगण्यातही उरला राम नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा