गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

मी बी होतो.. हुसार…

मी बी होतो त्याच्यासारखाच हुसार…
अगदी उन्निस बीस चा फरक व्हता..
लाई मजा यायची.. सालंत..
मास्तुर प्रश्न इचारायचे नि आम्ही दोगांच उत्तरं द्यायचो…

मास्तर म्हणायचे..
तुमि दोग खूप पुढं जाणार..
आई बापाचं नाव मोटं करणार..
तो खूप शिकला.. लयी मोठा झाला...
आई बपाचं नाव काडलं..
आन् मास्तुरला बी खरं ठरवलं..

पण माझं मात्र आसं काईच झालं नाई..
माझ्या वाट्याला असं नशीब कधीच आलं नाई..
बा बेवडा अन् आई मोलकरीन..
बा मला मारायचा.. आई म्हणायची..
मी तुला म्होटा करीन..


एकदूम तो दिसला नि मनात इचार आला..
माजं बी आई वडील आसतं तर??
मी बी असाच मोटा झालो असतो..
आईला आराम मिळाला असता..
मी बा मग गप्प झाला असता..

आई बा च्या भांडणात एक दिस
आईचा जीव गेला..
आन् तिला मारलं म्हणून माझा बा तुरुंगात गेला..
दोघं बी गेले र्‍हायलो मी..
आता माझं बगायला होतो फक्त मीच..
आन् मी काय करायचं हे ठरवायला बी मीच..

हाती पडलं ते काम करत रायलो..
कासाची साला नि कसच काय..
दिवसभर काम करून बी..
पोट काय भरत नाय..

1 टिप्पणी: