सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

किल्ले तोरणा... उर्फ प्रचंडगड


तोरणा... शिवरायांनी हाच किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरं बांधले असे म्हणतात... अर्थात त्याआधीही राजांकडे काही किल्ले होतेच... परंतु, स्वराज्यस्थापणेची खरी सुरूवात तोरणा किल्ल्यापासून झाली... तोरणा हे नाव पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे गडावर आढळणारी तोरणा जातीची वनस्पती... गरूडाचे घरटे.. असे बिरुद मिरवणारा हा किल्ला... या किल्ल्यावर मी आजवर ३ वेळा जाउन आलोय... सर्वात आधी कॉलेजच्या मित्रांसोबत... म्हणजे जवळपास ५ - ६ वर्षांपूर्वी.. आणि त्यानंतर... ओक्टॉबर २००८ आणि मार्च २००९ मध्ये. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन दाखवणारा हा किल्ला... अगदी कोणत्याही वातावरणात अतिशय थंड वारे आणि प्रचंड पसराल्याने प्रचंदगड हे नाव सार्थ करणारा... हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात. तालुक्याच्या ठिकाणीच... साधारण ४००० फुट उंची असलेल्या किल्ल्यावर जायला सद्ध्या एकाच रस्ता वापरात आहे... तो म्हणजे वेल्ह्याहून... आणि हो राजगडावरून येणार्‍या डोंगररांगेहूनही या किल्ल्यावर प्रवेश करता येतो... या किल्ल्याचे मुख्यत्वे दोन भाग आहेत... एक आहे तो झुंझारमाल मचीपासून कोकण दरवाजा किंवा हत्तिमाळ बुरुजापर्यंतचा... आणि दुसरा भाग.... हत्तिमाळ उतरून खाली जाउन कोकणबाजू पर्यंत... याच भागात बुधलामाची वाघ दरवाजा, राजगडची वाट ई. ठिकाणे आहेत...

http://picasaweb.google.com/veebee009/TornaMarch09#
http://picasaweb.google.com/veebee009/Torna02#

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा