एक दिवस अचानक समोर येतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा