रस्त्यावरून दिसणारं एक गाव..
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..
गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..
मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..
पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय
या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा