मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

तिची तक्रार.. त्याचे उत्तर...

तिची तक्रार..

तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..

आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...

कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..

त्याचे उत्तर...

मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..

साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..

आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..


म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा