सोमवार, २७ जून, २०११

कविता का करायची?

कविता करायची नसते
जिंकण्यासाठी
किंवा हरण्यासाठी,

कविता करायची नसते
कोणाला काही सांगण्यासाठी,
किंवा काही विचारण्यासाठी,

कविता करायची नसते
कोणालाही मार्ग दाखवण्यासाठी
किंवा मार्ग शोधण्यासाठी

कविता करायची असते
ती केवळ व्यक्त होण्यासाठी
मनातले भाव मूर्त रूपात आणण्यासाठी..


वाचणार्‍याने ठरवायचे असते
कवितेत काही आहे की नाही
त्यानेच ठरवायचे असते
त्यातून काही घ्यायचे की नाही

पण, वाचकाने काहीही ठरवले
तरी एक मात्र विसरायचा नाही
कविता कशी का असेना,
व्यक्त होणे थांबवायचं नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा