बुधवार, १५ जून, २०११

अंतर...

कणाकणातही असते अंतर...
क्षणाक्षणातही असते अंतर..
तनातनातही असते अंतर...
मनामनातही असते अंतर..
जीवन म्हणजे तरी काय हो??
जन्म अन् मृत्युतले अंतर..
अंतर कापायचे की..जीवन जगायचे
ज्याचे त्याने ठरवायचे असते..
कारण, या जगात येणार्‍या प्रत्येकालाच..
एके दिवशी परतायचे असते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा