स्त्री म्हणजे आई
ममता अन् माया...
आई म्हणजे वटवृक्ष
घनदाट तिची छाया....
स्त्री म्हणजे प्रेयसी
प्रेम आणि विश्वास..
प्रेयसी म्हणजे स्वप्न
सत्य किंवा भास...
स्त्री म्हणजे भक्ति
देवजीची आस..
भक्ति एक भाव..
जिला पुर्णवताचा ध्यास...
स्त्री म्हणजे शक्ति
तरवारीची धार...
शक्ति म्हणजे सामर्थ्य
आत्मसाक्षात्कार....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा