दिशा चुकली की
आयुष्य भरकटते...
पण... मग,
दिशाहीन आयुष्य असूच कसे शकते??
चुकीची का होईना
दिशा तर मिळालीच ना...
निदान या वळणावर
मला माझी चुक कळलीच ना...
यापुढे काळजी घ्यायची...
निर्धार करायचा..
दिशा.. पुन्हा नाही चुकायची...
समोर येणारी प्रत्येक परिस्थिती
विचार करूनच संभाळायची..
मग काय... दिशा बदलली...
मार्ग बदलला.... पुढे जाउन धेय्यास मिळाला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा