ध्यास...
दिगंतापर्यंत चालत जाण्याचा...
चालता चालता क्षितिज गाठण्याचा...
क्षितिजावरून झेप घेण्याचा...
झेप घेताच उंच उंच उडत जाण्याचा...
उंच आकाशातून
धरतीकडे पाहण्याचा...
उंचावरून पाहताना
भूतकाळ आठवण्याचा...
आणि त्याच भूतकाळाशी तुलना करण्याचा..
तुलना करून आनंदित होण्याचा...
उंचावर पोहोचून...
पुन्हा धरतीवर परतण्याचा...
ध्यास...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा