बुधवार, १५ जून, २०११

मिठीत त्याच्या...

विचार करीता त्याचा
मज सुचेनासे होते..
त्याच्याच विचारात कुठेशी
मग हरवूनि मी जाते..

येते भान मला मग..
वाटते जग विहरूनी मी आले..
त्याच्या आठवस्पर्शांनी
मन चिंब चिंब झाले..

केवळ मग गुंतून जाते..
आठवणीत त्याच्या..
तो येता सामोरा मी जाते..
सामावूनि मिठीत त्याच्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा