बुधवार, १५ जून, २०११

इथेच थांबेन बहुदा...

कधीपासून वाट पाहतोय...
पण ती अजुन नाही आली..
कितीवेळा साद दिली..
पण प्रतिसादच येत नाही...

वाटेवर दिसतात फक्त
तिच्या पाउलखुणा... जातानाच्या...
सादेला प्रतिसाद येतात फक्त
प्रतिध्वनिन्चे, कुशीतून.... डोंगराच्या...

इथेच तर भेटलो होतो तिला..
अगदी पहिल्यांदा...
इथूनच तर गेली होती ती..
अगदी शेवटची...


जाता जाता म्हटली नाही ती..
परत येइन म्हणून...
पण तरीही वाट पाहतोय तिची...
पाहावीशी वाटते म्हणून..

भीती वाटत राहते..
मी निघताच तिने इथे पोहोचायची...
मी का थांबलो नाही
म्हणून, तिच्या परत मागे फिरायची...

इथेच थांबेन बहुदा...
याच वळणावर...
कदाचित ती पोहोचेलही...
माझ्या.. चीतेच्या जळणावर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा