गुरुवार, २३ जून, २०११

स्पर्श तुझा वा कल्पना
दोन्ही शहारुन जातात मला..
वार्‍याची झुळुक अन् सूर्यकिरणे
जणू बहरूण जातात फुला...

क्षण प्रत्येक भेटीतला तुझ्या
अन् गंध तुझ्या मिठीतला
जणू पावसात भिजलेल्या
दरवळणार्या मातीतला

अश्या तुझ्या प्रत्येक अदेवर
मी रोजच भाळत राहतो..
तुझ्या सोबतीतल्या क्षणाचे
मी प्रत्येक पान चाळत असतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा