जे जे आले जगी या...
जायचेच कधी ना कधी...
कोणासाही नसे कल्पना
आपली वेळ येणार कधी??
प्रत्येक गोष्ट अनिश्चित
तरीही एक मात्र पक्की आहे..
या जगतावर येणार्याची
गच्छन्ति नक्की आहे...
तोवर मिळालेल्या संधीचे
सोने करणे जरूरी आहे...
पण मी नाही भीत, कोण मारतो मला...
ही निव्वळ मग्रुरी आहे...
येतो जेव्हा काळ
तेव्हा विचारात नाही कोणासही
नेतो जेव्हा कोणा...
तेव्हा... सांगत नाही कोणासही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा