मंगळवार, २१ जून, २०११

तो अन् मी... तुला पुन्हा पुन्हा पाहतो...

रूपेरी वाळूच्या साथीने
जेव्हा फेसाळणारे पाणी
तुझ्या कायेशी भिडते..
सौंदर्यास तुझ्या ते खुलवून जाते..
अन् पुन्हा एकदा
मन हे माझे तुझ्यावरी जडते...
तो सूर्य जेव्हा स्पर्शून जातो..
तुज सोनेरी किरणांनी...
मोहरून उठते मन माझे
तन भरून जाते शहार्यांनी..
हळूहळू मग तो सूर्य
जेव्हा अस्ताला जातो...
क्षितिजावर तो अन्
किनार्यावर मी...
तुला पुन्हा पुन्हा पाहतो..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा