बुधवार, १५ जून, २०११

कधीतरी भेटल्यावर

कधीतरी भेटल्यावर ती माझ्यावर रागवते..
तू मला भेटतच नाही वगैरे मला ऐकवते...
तेव्हा तिला सांगतो मी...
सखे,
एकमेकांची संगत लाभायला
भेटायलाच हवे, असे नाही...
तुला माझ्या, मला तुझ्या,
भावना समजायला, शब्दांचीही गरज नाही..
मग मात्र ती हळूच माझ्या मिठीत शिरते..
तिची माझी प्रीत पुन्हा..
एकमेकांत विरघळते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा