बुधवार, १५ जून, २०११

दोन भारत...

आजच्या भारतात दोन भारत...

एक आकाशात झेपावतोय,
दुसरा गाळात रुतत जातोय...

एक सतत पुढेच जातोय,
दुसरा तसाच मागे राहतोय...

एका भारतात संस्कृती ही श्रीमंती,
दुसर्‍या भारतात श्रीमंती हीच संस्कृती..

एकाला सार्‍या जगाची भीती,
दुसर्‍याची सार्‍या जगाला धास्ती..

एकापुढे अमेरिकही छोटी,
दुसर्‍यापुढे मुंबईही मोठी...

एका भारतात सारे एकत्र,
दुसर्‍या भारतात दंगलींचे सत्र...

एका भारतात होतोय विकास,
दुसरा भारत दिसतोय भकास...

एका भारतात आदर नि प्रेम,
दुसर्‍या भारतात खुन्नस नि गेम...

एका भारतात रामराज्य,
दुसर्‍या भारतात सारेच त्याज्य...

माझा भारत चांगला व्हावा म्हणून कोणी तडफडतोय..
चांगला भारत माझा व्हावा म्हणून कोणी चडफडतोय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा