बुधवार, १५ जून, २०११

बघ देवा.... वार झाली इथवर आलो तरी पाउस काही येईना..
लावलेल्या पिकाचं काय झालं आसलं?
या विचारानच बघ पाय हितनं हालंना...
विटठला का रे राज्या कोपलास असा...
का आखदलास तुझा पसा?
पंढारीनता.. एवढ्यावर्षी दया कर आणि
काळी माय भिजू दे..
पाउस पडून हिरवाईनं सजु दे...
एवढा कर माझ्यासाठी
तुझं नाव सारखं घेईन..
जास्ती नाही करू शकत पण..
पुन्हा वारीला नक्की येइन..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा