बुधवार, २२ जून, २०११

भेट तुझी अन् माझी

आठवण तुझी मज येते अन् हरवून पुन्हा मी जातो
क्षण सोबत घालवलेला जणू परतून पुन्हा मग येतो

एकही दिवस नसे जेव्हा आठवण तुझी येत नाही
विचार तुझ्या नसण्याचा क्षणाचीही उसंत देत नाही

प्रत्येक क्षण तुझ्या सोबतचा मज घेऊन जातो मागे
भूतकाळ पुन्हा जागा होतो जोडतो तुझ्याशी धागे

जखम तुझ्या प्रेमाची कधीच भरणार नाही
भेट तुझी अन् माझी मी कधीच विसरणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा