आता... वय झालंय माझं...
नाही आता जमत पूर्वीसारखे कष्ट करणं...
होत नाही आता काहीच हातून...
नशिबी उरलय ते फक्त क्षण क्षण मरणं..
एक काळ असा होता जेव्हा
मी अगदी पडेल ते काम केलं...
माझ्या मुलांचे भविष्य घडवायला
जे जे गरजेचं ते केलं...
लेकरानं मागितलं
ते ते आणून दिलं..
लेकरला आवडलं..
ते सारं करू दिलं..
आज माझी लेकरं
खूप मोठी झालीयेत..
संसार थाटलाय त्यांनी
त्यांनाही लेकरं झालीयेत..
पण त्यांच्या सार्या व्यापात
त्यांचा कशाशीच मेळ नाही..
आजवर मोठं केलेल्या
आई-बापासठीही त्यांना वेळ नाही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा