बुधवार, १५ जून, २०११

ती... गेली... तेव्हा....

ती.. गेली... तेव्हा..
ना पाउस.. रिमझिम..
ना सूर्य... किरणंशी खेळणारा..
चंद्रही नव्हता हसता...
फक्त दिसला... एक तारा निखलणारा...

ती... गेली... तेव्हा..
घरट्याच्या वाटेवर पक्षी..
पण अगदी शांत, उदास...
घरातेही डोलीमधले.. उध्वस्त...
चटका लावून गेले मनास..


ती... गेली... तेव्हा...
जलधारा डोळ्यांमधल्या...
सुकून.. आटून गेलेल्या..
मनातल्या सार्‍या संवेदना...
थकून.. मरून गेलेल्या..


ती... गेली... तेव्हा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा