बुधवार, १५ जून, २०११

पुन्हा तिच्या प्रेमात

पाउस... आभाळ.. वीज आणि छत्री..
दोघेच रस्त्यावर.. अन् 'ती' ही भित्री...
वीज आपल्यावरच पडणार अशी तिला खात्री..
अन्, तिच्याबद्दलचे प्रेम.. दाटलेले.. त्याच्या नेत्रि...

ढग दाटून आल्यापासून ती त्याला बिलगलेलि..
त्यातून तिची नवी साडी.. भिजलेली..
त्याला मात्र एकच काळजी पडलेली..
उडून तर नाहीना जाणार.. छत्रि.. धरलेली?

अश्यात अचानक वारा आला..
आणि खरेच छत्रि घेऊन गेला..
तिचा चेहरा कावरा बावरा.. अन्..
काय करावे कळेचना त्याला...

कुठून काय माहीत पण
तिला अचानक आनंद झाला..
भर पावसात तिच्या तारुण्यला..
जणू बहारच आला..

पावसमध्ये भिजताना ती
सारे काही विसरून गेली..
बेभान पाओस अनुभवताना त्यालाही ती
स्तिमित करून गेली..

तो मात्र तिच्याकडे पहातच होता..
तिचे सौंदर्य..
अन् हे नवे रूप पाहून
पुन्हा तिच्या प्रेमात पडला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा