शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

लिहायचो मी..

असेच काहीसे लिहायचो मी..
वर्णन तिचे कधी करायचो मी...
कधी सौंदर्याचे तिच्या...
तर कधी प्रेमावर तिच्या लिहायचो मी..

भेटायची मला जेव्हा ती..
केवळ पहात राहायचो मी..
एकाच तिच्या नजरेने नेहमी..
पुरता घायाळ व्हायचो मी..

आताही लिहितोच आहे..
वर्णन तिचे करतोच आहे...
पण, आता आहे सोबतीस ती माझ्या..
पुर्वी... स्वप्नातच केवळ पहायचो मी..

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

विचारांचा पाउस...

विचारच करत होतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?

आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?

विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?

विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

गाव मात्र एकटं झालंय...

रस्त्यावरून दिसणारं एक गाव..
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..

गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..

मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..

पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय

या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

तिची तक्रार.. त्याचे उत्तर...

तिची तक्रार..

तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..

आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...

कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..

त्याचे उत्तर...

मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..

साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..

आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..


म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..

मंगळवार, २७ जुलै, २०१०

पाउस अचानक येतो..


सखी येत असता भेटण्या त्याला..
पाउस अचानक येतो..
सखिला उशीर होतो..
अन् प्रियकर तिजसाठी झुरतो..

पाउस थोडा विसावतो...
सखी भेटण्या प्रियाला निघते..
सखी वाटेवरती असता..
पाउस पुन्हा बरसतो..

सखी भिजते.. तशीच निघते..
प्रियाला भेटण्या पोहोचते..
पाहताना साखिला येताना
प्रियकरही आनंदून जातो...

पाहता भिजलेल्या साखिला
प्रियकर मोहित होतो..
ती मिठीत त्याच्या शिरता
पाउस पुन्हा जोर घेतो..

प्रेमास त्यांच्या फुलवण्या
पाउस.. असाच नेहमी येतो...

मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवीने जगायचे... वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीने लिहायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्‍म्यातून

कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..

कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...

पाउस... असाच येतो...

पाउस... आठवायला लागत नाही..
तो अचानक कोसळतो..
कधी मेघांतून... कधी मनातून..

तो मेघांतून बरसतो...
थेंबांच्या धारा होऊन..
कधी मनातून बरसतो..
आठवणींचा वारा होऊन..

कधी येतो तो लेखणीतून..
शब्दांच्या गारा होऊन..

कधी डोळ्यांतून बरसतो..
सुख-दुःखाच्या आसवांतून...
कधी ओठांतून खुलतो..
निखळ हास्यातून...

पाउस... असाच येतो...
निरनिराळ्या रुपांतून...

गोष्ट तिची अन् त्याची....

तीच रोजचीच गोष्ट... तिची अन् त्याची..

तो अन् ती.. जणू राजा अन् राणी..
वेगळी नसेलही कदाचित..
पण.. एक सुंदरशी प्रेमकहाणी...

सुरू होण्याआधीच संपणारी...
संपूनही कधीही न संपणारी..
अधुरिच खरी...
पण मनाला भावणारी..

त्या दोघांची म्हणता म्हणता...
माझी नि तुमची होणारी..
गोष्ट तिची अन् त्याची....
__________________विनायक बेलोसे

शुक्रवार, ९ जुलै, २०१०

"संवाद"... तो व्हायला हवाय...

तडा गेला तो गेलाच...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....

तिचे म्हणणे एकच... 
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...

त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...

दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...

गुरुवार, ८ जुलै, २०१०

क्षणाचाच मी...

क्षणात हिरवा.. क्षणात पिवळा..
क्षणात होतो मी कधी गहिरा..
क्षणाचाच तो विलंब केवळ..
क्षणात उदास मी.. क्षणात हसरा..

क्षणाक्षणाला बदलत जातो..
क्षणात ऋतूही मागे पडतो...
क्षणात कधी मी इतका बदलतो..
क्षणातच ऋतूला पुन्हा गाठतो...

क्षणच काय तो मजसोबत पळतो..
क्षणाबरोबर मी ही पळतो..
क्षणाचाच मी... क्षणही माझा...
कधी तो क्षणही मजवर जळतो...

गुरुवार, १ जुलै, २०१०

गूढ.. अगम्य... केवळ सावली...

निशब्द.. शांतता...
कशाचही आवाज नाही...
आस-पास कोणी ही नाही...
केवळ... निशब्द शांतता..

त्यातून येणारा एक आवाज..
घुंगरांचा... मधुर...
अगदी काळजाला भिडणारा...
त्या निशब्द शांततेला...
मधूनच चिरणारा....

मागून येणारी सावली...
कोण्या अद्न्यात व्यक्तीची...
कोणाची? माहीत नाही...
केवळ सावलीच ती...

भविष्यात होणार्‍या एखाद्या
अघटीताची तर नाही?
कोण जाणे...
पण.. सावली दिसतीये खरी..
गूढ.. अगम्य... केवळ सावली...

शनिवार, १२ जून, २०१०

पाउस...

पाउस...
कधी आठवणींचा... तर कधी नाविण्याचा...
कधी रिमझिमत्या थेंबांचा,
कधी तिच्या नाजूक स्पर्शांचा...

पाउस...
कधी तिचा... कधी माझा...
कधी आम्हा दोघांचा..
कधी दोघांमधल्या मौनाचा..
तर कधी... ना संपणार्‍या गप्पांचा...

पाउस...
कधी शांतपणे पडणारा...
कधी धो धो येणारा...
कधी केवळ मृदसुगंध देणारा..
कधी.. अखंडपणे साथ देणारा...
पाउस...

रविवार, ६ जून, २०१०

प्रेमात तिच्या मी पडलो...

असेच कधी पावसात भिजताना
तिला पाहीले होते...
तिच्या सौंदर्याच्या प्रत्येक अदेवर
मी... माझे मन वाहीले होते...

पाहताच तिला मज पटले होते..
सालसता ती हीच खरी...
तिच्या नसा-नसात भणली होती
जणू, तारुण्याची प्रीत खरी...

नजर मिळविता तिने नजरेशी
घायाळ पुन्हा मी झालो..
मला खरे कळलेच नाही
कधी प्रेमात तिच्या मी पडलो...

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

तू.. अन् तुझी निखळ मैत्री..

रोज भेटायचो आम्ही.. अगदी आवर्जून
गर्दी असेल भेटायच्या जागी..
तर हाक मारायचो एकमेकांना... हात उंचावून..

भेटलो की बोलायचो.. माझ्याबद्दल, तिच्याबद्दल..
आणि खूप सार्‍या विषयांबद्दल...
रंगायच्या आमच्या गप्पा.. भरपूर..
भाणही नसायचे.. वेलेबद्दल..

इतक्या गर्दितही गप्पा मारताना..
आम्ही कोणाच्या मद्ध्यात नसायचो..
आणि कोणी त्रास देऊ गेला..
की त्याला अद्दल घडवायला मागे नसायचो..

अशीच आमची मैत्री होती,
अगदी झार्याप्रमाणे निखळ..
एकमेकांबद्दल विचारही होते.
पाण्याप्रमाणे नितळ.

पण एकदिवस ती म्हणाली..
"मला तुझ्याशी बोलायचे नाही..."
का? म्हणून विचारले तर..
"मला तुला ते सांगायचे नाही.."

खोडून विचारल्यावर कळले..
ती माझ्यात गुंतली होती..
मला थोडा धक्काच बसला.. कारण..
ही गोष्ट माझ्या मनातही नव्हती..

थोडा विचार केल्यावर वाटले..
मलाही ती आवडते..
एखाद्या दिवशी नाही भेटलो तर..
माझे ही खूपकही आडते..

पण असा विचार कराण्याइतके..
नशीब साथीला नव्हतेच कधी..
कारण माने जरी जूळली तरी..
'जोड्या' तर जुळल्या होत्याच आधी...

मग मात्र म्हटले तिला मी -
"ती आहे... नको तू बोलूस...
पण... विसरुही नकोस, कोणी मित्र आहे तुझा..
हाक दे केव्हाही.. जेव्हा मदत लागेल तुला.."

माझ्याही मनात राहशील तू..
अन् तुझी निखळ मैत्री.. तशीच..
वेगळे होऊनही एकटत्रच असु..
विसरणार नाही मी तुला.. कधीच..

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

शब्द असती जणू तारे ते आकाशीचे..
जोडून पाहता होते नक्षत्र कधी त्यांचे..
एकटे पाहता वाटे...
कोण असतील मित्र यांचे?
________________
पाहण्याचा ढंग आपुला
ठरवून जातो... चित्र नभाचे..
कधी दिसे ते एकट्याचे..
कधी कधी नक्षत्र ते चांदण्यांचे...

कविता करताना जेव्हा शब्द सुचत नाहीत तिला... 
करिता मी त्यावर कविता एखादी...
म्हणते माझे सारे शब्दही साथ तुला देती..
मज एकटी करून जाती..
का असे ते वागती मजपाशी
प्रयत्न करते मी किती..
त्यांना सजवन्याचे, फुलवण्याचे   ..
सोबत त्यांच्या कोण्या एका स्वप्नांच्या गावी जाण्याचे..
तरीही का रे जमत नाही मज..
तुझ्या सारखी कविता..
सांगतो तिला मग
सखे, शब्द केवळ आहेत माझे..
भाव मात्र नेहमी तुझे मग..
का बोल राग तुझा कश्याकरिता?

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

बस पलभरभी याद ना रहा..
उनको हमारे साथ जो बिताया था..
तो प्यार क्या याद रहेगा उन्हे..
जो हमने उनसे जताया था..

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

ओर्कुटवर झालेली मैत्री
कधी वाढत गेली,
कळलेच नाही त्या दोघांना..
मैत्रीचे प्रेम कधी झाले
समजलेच नाही त्यांना..
प्रेमात पडले होते खरे दोघे..
भेटले मात्र नव्हते कधीच...
आयुष्यभराच्या आणा-भाका मात्र
झाल्या होत्या आधीच...
कधी स्क्रॅप, कधी ईमेल
कधी कॉल करून बोलणे..
एकमेकांना चिडवणे..
एकमेकांसाठी झूरणे...
ऑनलाइन भेट नाही झाली
तर रुसणे तर कधी भाण्डणे..
मग आला दिवस प्रेमाचा...
ठरला बेत भेटिचा..
जागा ठरली... वेळ ठरली..
दोघे अगदी आतुरतेने भेटले...
इतके दिवस प्रेमात असूनही..
आज खरे मिलन झाले..
इतके सारे होऊनसूद्धा
काहीतरी वेगळे होते..
भेटीत दोघांच्या गप्पा सोडून
बाकी सारे जमले होते..
एकमेकांना समोर पाहून
आनंद गगनात मावत नव्हता...
पण... नेमके काय बोलावे
याला विषयच मिळत नव्हता..
एकमेकांची चौकशी झाली
पुढे काहीच होत नव्हते..
एकमेकांना पाहून हसण्याखेरीज...
दोघांना काहीच जमत नव्हते...
दुसर्या दिवशी पुन्हा
दोघे ऑनलाइन भेटले...
एकमेकांची माफी मागून
पुन्हा गप्पांमध्ये गुंतले..
---------------------------------
थोडक्यात काय...
माने आलियेत जवळ...
साधने झालीयेत अफाट...
सभाषणाला मिळालाय वेगसुद्धा सुसाट..
पण इतके सारे होऊनही...
एक मात्र कमी आहे..
प्रत्यक्षात भेटनार्‍या माणसातले...
अंतर मात्र वाढत आहे...

उद्देश... माझा.. जीवनाचा..

उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलाय.. मस्तपणे हुन्दडायला...
कधी वाटले.. छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास.. जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला.. त्या शंभुराजाला...
त्या शाहूला.. फुले आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून? खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय? कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल.. कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आनेल आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

विचार... चौकटीच्या बाहेरचा..

कधी केलाय विचार?
चौकटीच्या बाहेरचा..
कधी पहिलाय अंधार?
नजरेच्या पलीकडचा...

कसा कोणास ठाऊक..
पण मला तो अंधार दिसला..
आणि पडला प्रश्न..
या सुवर्ण काळाच्या जगात तो काळा कोपरा .. कसला??

नीट पहिले तेव्हा दिसले..
जाणवले..
ही तर वेगळीच दुनिया..
आपल्याच दुनियेतली..
आपली भूक वरवर्चीच..
इथली भूक 'आतली'

आपल्या जगातून येणार्‍या
दयेच्या किरणांवर हे जगतात..
ज्या ते ही नाही मिळत..
ते त्या अंधारातच मरतात...

काही ना काही घडल्यावर..

वार्याची एक झुळुक..
घामाने थबथबल्यावर..
पारावरची सावळी..
उन्हात फिरून आल्यावर..
थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..
परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..

अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..
काही ना काही घडल्यावर..
अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..
इतका की विशाहूनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात..

कंटाळा येतो ना..

कंटाळा येतो ना.. मला..
तेव्हा मी कविता लिहितो...
चार.. ओळींची.. नाही म्हणजे तसे मी ठरवतो..
की लिहुयात काहीतरी लांबलचक.. वेळ जाईल निघून..
मग मी लिहु लागल्यावर हलू हलू माझा उत्साह संपत संपत कविता ही संपते..
आणि मग ती राहते.. फक्त चार.. ओळींची नव्हे..
शब्दांची..
मग उगीच तिला शेपटी लावतमी तिला लांब करत नेण्याचा प्रयत्न करतो..
हनुमानाच्या शेपटीएवढी कविता लिहीण्याचा संकल्प..
त्याच शेपटी ला कापड गुंडालणार्‍यांच्या उठशाहासारखा कमी होतो..
आणि मी अर्ध्यातच शेपटी पेटवून देतो..
काय?
शेपटी पेटवतो? कोण?
मी.. कविता सम्पवतो..
आणि मग मला कळते.. की शेपूट कुठली..
वेळ जावा म्हणून नकळतच मी थंडीत.. (म्हणजे ए सी च्या)
शेकोटी मिळावी म्हणून कविताच पेटवून दिलेली असते..
त्या कागदाची राख गोळा करायची ही इच्छा नसते..
मग मी त्या राखेवरच दुसरी कविता लिहीत लिहीत..
कधीतरी झोपी जातो..

कविता मी आणतो..

कविता मी आणतो.. त्या गावाहून..
जिथे सापडतो स्वप्नसडा... रोज रातीला..
भेटतो जिथे रवि.. किरणांना...
अन् चंद्र चांदन्यांना..

भेटती जिथे भाव मनीचे सारे...
जणू आकाशातील तारे..
नसे जिथे कल्पनेस बंध..
दर वळतो जिथे रातरानी सुगंध..

परतत असता भेटती शब्द
म्हणती येतो सोबतीला...
जाती देऊन जाता जाता..
अर्थ माझ्या कवितेला..

चंद्र गेला तरी कुठे?

एके रात्री ती सोबत असताना..
वाटले... तिला डोर कुठे न्यावे..
मस्त चांदण्यात फिरवून आणावे..
दाखवावा चंद्र नि म्हणावे..
"प्रिये, पहा... तो चंद्रसुद्धा तुझ्यासाठीच झुरतो जणू...
त्याचे झुरनेच हे सारी रात्र
चंदेरी करून जातेय..."
पण, चंद्र काही दिसत नव्हता...
चांदणे तर अगदी लख्ख...
मग, चंद्र गेला तरी कुठे?

चंद्राची वाट पहात
हळूहळू पहात झाली.. उजाडू लागले...
झोप मोडली नि समोर चंद्र दिसला...
विचारले त्याला..
"काय रे होतास कुठे?"
तो म्हटला... "अरे.. असं काय करतोस..?
तुझ्याच सोबत तर होतो रात्रभर..
अगदी तुझ्या शेजारी...
तुझ्या सखीच्या चेहर्यावरचे तेज बनून... "

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

आणि पुन्हा कामाला लागतो..

कधी चांदण्या पहिल्यात....
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..

जगावं ... कुणासारखं?

कधी वाटतं जगावं... पक्ष्यांसारखं
पंख पसरून फिरावं स्वछन्दि
राज्य करावं आकाशावर
कुठंही विचरण्यास नसावी बंदी

कधी वाटतं जगावं... माश्यासारखं
खोल खोल पोहत जावं
सागराच्या तळाशी राहावं
आणखी खोल जाताना, अडवणारं कोणी नसावं

कधी वाटतं जगावं... चंद्रासारख
रोज रात्री यावं
कधी मोठं व्हावं, कधी गायब व्हावं
कवींच्या कल्पनेत सतत रहावं

कधी वाटतं जगावं... सूर्यासारखं
सार्‍या जगास प्रकाश द्यावा
दिसामाजी आराम करावा
रोज सार्यांचा नमस्कार घ्यावा

कधी वाटतं जगावं... राजासारखं
आपल्याच धुंदीत राहून
प्रजेला ताब्यात ठेवून
वाटेल तसं राज्य करून
सार्‍या जीवनाचा घ्यावा आनंद

कधी वाटतं जगावं... योग्यासारखं
काही नसून असल्यासारखं
सारं असून नसल्यासारखन
भिकारी असूनही... राजासारखं

शेवटी वाटतं जगावं... आपल्याचसारखं
शरीर इथे.. अं मन कुठे
आपण आले राहून सुद्धा
जाउ शकतो पाहिजे तिथे..

संकल्प...

आत्तापर्यंत वागलो तसं...
पुन्हा कधीही वागायचं नाही..
आत्तापर्यंत जगलो तसं...
पुढचं आयुष्य जगायचं नाही..

फक्त पुढेच चालत जायचं..
मागे वळून पाहायचं नाही...
नव्या शिखरांवर आरूढ व्हायचं
एकाच ठिकाणी रमायचं नाही..

नवी स्वप्ने नवा ध्यास...
रोज गाठायचं नवं आकाश..
उंच हवेतला मोकळा श्वास
धरतीकडे पाहताना ठिपक्याचा भास..

इतकं उंच उडत असताना
एक मात्र विसरायचं नाही...
कितीही यश मिळालं तरी..
माणूसपण सोडायचं नाही...

स्वप्न ... मनातल्या साठवणींचे....

असाच एकांती बसलो होतो..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..

आयुष्यात माझ्या परत ये...

एक सांगू?
तू जरी नाही बोललिस ना...
तरी डोळे मात्र बोलतात तुझे..
ओठी तुझ्या काहीही असलं..
तरी मनात मात्र विचार माझे..

कळतंच नाहीए मला..
तू अशी का वागतियेस..
काहीच कारण नसताना..
स्वतःलाच का त्रास देतियेस?

सारी दुनिया झूठ असेल..
तुझं प्रेम झूठ नाही..
माझ्याशिवाय तुझ्या मनात..
कोणी असणं शक्यच नाही..

मनातली गोष्ट करायला
दुनियेची भीती हवीच कशाला?
दुनियेलाच जर गरज नसेल..
तर आपल्याला त्यांची गरज कशाला?

पुन्हा पुन्हा विनवतोय मी
आयुष्यात माझ्या परत ये...
पूर्वीचं सारं विसरून जा..
आणि माझ्या कवेत ये...

(एक जुनी कविता... ती त्याला सोडून गेलेली असताना त्याने तिची केलेली विनवणी.. )

मी.... केवळ.. निमित्तमात्र...

शब्दांना व्यक्त व्हायचं असतं...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्‍यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...
सुर्या उगवला.. पश्चिमेला..
नि ध्रुवाने सोडीली जागा.
आली ती जन्मानन्तर भेटीला..
जणू सापडला स्वर्गसुखाचा धागा...

अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..

सुरुवातीला होते अडचण..
शब्दरचना करताना...
खूप कष्ट घ्यावे लागतात
शब्दांचे यमक जुळवताना...

कधी कधी जमते सारे..
कधी फजितिही होते...
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
मग कविता लिहीणे जमू लागते..

शब्दांनाही जाणवते मग
आपल्या मनी भाव आहे...
कधी आज कधी उद्या..
तर कधी.. आठवणींचा गाव आहे..

शब्दच मग येऊ लागतात
सदैव आपल्या मदतीला...
पाहता पाहता सजवून जातात
आपल्या मनीच्या कवितेला...

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...

आली निवडणूक पुन्ह्यांदा...
आणखी एक सुट्टी मिळणार हाय...
माझ्या लेकरा-बाळाला घेऊन
मी सहलीला जाणार हाय...

उभ्या असलेल्या उमेदवारांमधी..
कोणीच निवडायच्या लायकीचा न्हाय
आणि म्हणूनच मला यावेळी बी..
मतदानाला जायचं न्हाय...

असाच विचार करून
निम्म मतदानबी होणार न्हाय
अन्.. शंभरातल्या ७० ला नको असूनबी...
एक उमेदवार निवडून येणार हाय...

एक एक मत विकत घ्यायला
त्यानं बक्कळ पैसा खर्च केलेला हाय..
आणि म्हणूनच तो बिनपैशाची
कोणाचीच कामं करणार न्हाय...

म्हणून सांगतो मंडळी..
मतदान करणं गरजेचं हाय..
कारण, सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
"INDIA"चा भारत होणार न्हाय...

हे.. असेच चालायचे..

शब्दाला शब्द जोडायचा...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...

मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्‍याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...

म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..

पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१०

पण... राया आधी...

काल बाजारी नजर भिडवूनि
केला तुम्ही मला इशारा
मनात भरता वचन दिले मी..
देईन तुम्हा मी ताबा सारा...
आज पौर्णिमा वचनपुर्तीची
घ्या तुमचा लवाजमा
पण... राया आधी... दार जरा लावून घ्या...


विसरूनी जाल भान तुम्ही
पाहुनिया एकदा..
डेरेदार घट, नाजूक काया
काळ्याभोर केशलता
खजिना आहे किमती माझा...
जपून थोडा लुटा..
पण.. राया आधी.. दार जरा लावून घ्या...

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

तिच्याच रूपाने....

तिच्या ओठांचा गोडवा असा..
की मधुही मज कटू वाटे...
तिच्या हास्याची खळखळ...
जणू अम्बरि घन साचे...

थेंब गालावरूनी जेव्हा
जातो तिच्या ओघळतो..
त्याच्या नशिबाला पाहून..
जीव माझा जळतो...

तिच्या सौंदर्याच्या कडा
अप्सरेलाही लाजविति...
पावलेही नाजूक अशी
स्पर्शाने मेघात वीज नाचविती...

पाउस येतो जेव्हा, वाटे .
सौंदर्यच जणू बरसे तिचे...
तिच्याच रूपाने जणू
खुलते रूप या धरतीचे...
 हारे तो हम तब थे
जब पहली नजर मिली ती उनसे..
अब तो बस यहि उम्मिद लिये बैठे हैं
के उनको जीत ले हम.... जमानेसे
दिल में एक हलचल सी होती
कुछ ख्वाब लब्जोमें सिमट जाते हैं..
बस.. हम उन लब्जोको लिखते राहते हैं..
और कारवा बन जाता हैं...
उन्होने यु कह दिया के तुम बडे प्यारे हो..
के जान निकल के हाथो में आ गायी हमारी...
बस एक प्यारे लब्ज से यु घायल हुए हम
के हमने हमारी जान उन्हे नजर कर दी..
वो पुछते हैं.. बताओ आपको
हमारे दिल का हाल पता भी हैं..?
और हम के बस उनके दिल की
हर धडकन को याद रखते हैं..
यु अदाए दिखाती हैं वो
के कयामत आ जाए..
दिल चाहता हैं, देखतेही रहे उनको..
फिर चाहे पुरी दुनिया डूब जाए...

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

उसके होठो में वो नशा हैं
के हर जाम फिका लगता हैं..
एकबार बस उनको छुने का
हर अंजाम फिका लगता हैं..

नजरें तो यु कातील हैं उसकी...
के कत्ल-ए-आम फिका लगता हैं..
बस एक बार मिल जाए जो नजर
मार जाना भी फिका लगता हैं..
नीडरपणा केवळ बोलळ्यातच नसतो.
कधी तो डोळे भिडवण्यातही असतो..
प्रत्येकवेळी बोलायलाच हवे असे नाही..
कधी नजरेतला इशाराही ओळखायचा असतो...
सुर्या उगवला.. पश्चिमेला..
नि ध्रुवाने सोडीली जागा.
आली ती जन्मानन्तर भेटीला..
जणू सापडला स्वर्गसुखाचा धागा...

अचानकच....

मला कधीच वाटलं नव्हतं...
कोणी माझ्या आयुष्यात येईल...
... अचानकच तू आलीस...
माझं सारं जग व्यापून गेलीस...
अक्षरशः माझ्यावर राज्य केलंस
आणि तशीच निघूनही गेलीस...
तू आलीस अन् सारं काही
अचानकच होऊ लागलं...
अचानकच तू माझी झालिस,
अचानकच मी बदलू लागलो..
अचानकच लोक म्हणू लागले..
अचानकच मी सुधारू लागलो..
तू आलीस तेव्हा वाटलं नव्हतं...
अशीच अचानक निघून जाशील...
उंच आभाळात नेऊन मला
अचानकच सोडून देशील..
अशा तुझ्या वागण्यानं मला
अचानकपणाची सवय झालीये...
तू अचानक परत येण्याची
पुन्हा मला ओढ लागलीये...

शब्दांचीच कविता होते...

शब्दांचीच कविता होते..
कवितेचे गाणे होते...
आणि एकदा गाणे झाले की ..
सतत.. भावांच्या गावी..
जाणे येणे होते..

भाव मनी दाटता. .
शब्दरूपाने बरसात येतो..
स्वर लाभता तयाला..
भाव नव्याने बरसतो ..
मनास सार्‍या भिजवून जातो
गावी स्वप्नाच्या घेऊन जातो..

म्हणून लिहिली मी कविता....

रंग... कसे दिसतात? कसे दिसणार मला?
डोळे कसे.. दिपतात? कसे... ते कसे कळणार मला?
पण जाणवते मज.. हळूवार झुळुक...
ऐकू येतो मज.. थेंब.. टूपुक...
समजते मला.. वार्याची भाषा
कळतात मज कोकिलेचे सूर.. न
पावसाची आशा..
म्हणून लिहिली मी कविता जाणीवेवर..
मात करून माझ्या.. अंधारावर..

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

एक भेट.....

खूप काही विचारायचंय
खूप काही बोलायचंय...
सांग बरं कधी भेटशील?

तुला काही सांगायचंय...
माझ्याबद्दल... तुझ्यबद्दल...
एकूणच सार्‍या जगाबाद्दल..

माझा गुन्हा जाणून घ्यायचाय...
तुझी चुक दाखवून द्यायचीये..
आजवर तू जे जे केलंस...
त्याबद्दल तुझी हजेरी घ्यायचीये..

सांग बरं... कुठे भेटशील?
देवळात...? नको तिथे गर्दी असते...
डोंगरावर?.. नको तिथे थंडी असते..
असं कर... तू स्वप्नात ये...
मला तुझ्या सोबत ने..

तुझं म्हणणं मला सांग...
माझं म्हणणं ऐकून घे.. .
मलाही थोडे प्रश्न विचार
नि माझ्याही प्रश्नांची उत्तरे दे..

खरंच देवा.. सांग कधी येशील स्वप्नात?
एकदा यायला हरकत नाही..
तसा.. सततच आहेस की..
माझ्या मनात...

... आणखी एक रात्र....

तिची आठवण तर येते खूप..
वाटते आत्ता जाउन भेटावे...
पण उगाच ती झोपलि असेल..
स्वप्नांच्या दुनियेत रमलि असेल.. तर?
का तिला.. उठवावे?
पण मग हळूच मी तिच्या स्वप्नात शिरतो..
उगाच..
तिची खोडी काढायला..
ती मस्त चांदण्यात फिरत असताना
मी तसाच तिला निरखत राहतो..
ती इतकी सुंदर भासु लागते..
की मी खोडीसुद्धा विसरतो..
असाच तिला बघत असताना
अचानक ती समोर येते..
म्हणते...
"ए वेड्या... उठ की आता..
सकाळ झाली बघ...
कुठल्या स्वप्नात रमलायेस असा..?"
उठून पाहतो तर...
खरेच सकाळ झालेली असते...
आणखी एक रात्र तिच्या स्वप्नात संपलेली असते...

हवी आहेत माणसे...

हवी आहेत माणसे...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...

शनिवार, ३० जानेवारी, २०१०

समुद्र.... कसा?

समुद्र.... कसा?
............असा की... तसा?
समुद्र.... कधी शांत... कशी रागीट...
............कधी अस्ताव्यस्त... कधी नीट...
............कधी धीरोदत्त.... कधी उतावळा....
............कधी निळा... कधी सावळा...
............कधी उद्धट... कधी प्रेमळ...
............कधी गहिरा... कधी नितळ...
............कधी आनंदी... कधी रुसवा..
............कधी सरळ... कधी फसवा...
............कधी राजा... कधी वैरागी...
............कधी भाग्यवंत... कधी अभागी...
............कधी साधक... कधी बाधक...
............कधी ओंगळ... कधी मादक...
............कधी शहाणा... कधी वेडा...
............कधी संपूर्णच... कधी थोडा...

एकदा भेटली मला... माझीच एक कविता...

एकदा भेटली मला...
माझीच एक कविता...
म्हणाली.... किती दुष्ट आहेस रे तू?
प्रत्येकवेळी मला तिच्या हवाली करतोस...
तिचे मन जिंकतोस आणि तिलाच मिठीत घेतोस...

म्हटले.... मला नाही समजले...
कविता तिच्यासाठीच तर होती ना?
मग तिलाच देणार ना?

तर म्हणते कशी....
इतक्यावेळा तू माझ्या मदतीने
तिला खुश केलंस...
प्रत्येकवेळी मी ही जाउन..
तुझ्या मनातलं सारं...
मी तिच्यासमोर व्यक्त केलं...
आणि त्याच मनातल्या गोष्टींनी..
तिनेही तुला आपलंसं केलं...

हे सारे होण्यासाठी तू मला किती सजवलंस...
प्रत्येकवेळी मला एक नवं नि सुंदर रूप दिलंस...

पण.... प्रेम मात्र फक्त तिच्यावरच केलंस...

..... म्हणून... दुसरे काय...?

कविता वाचून ती म्हणाली..
किती किती भारी ते शब्द..
मी म्हटले..
भारी नाही.. इथलेच आहेत..
आपल्याच आसपासचे..अगदी रोजचे..
मी थोडे धुवून साफ करून घेतले..
व्यवस्थित कवितेच्या मांडणीत लावले..
म्हणून ते सुरेख दिसताहेत.. दुसरे काय...

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

... पुन्हा एकदा पहाट होते..

थोडीशी ही रात्र वेडी
थोडासा तो चंद्र वेडा
आणि 'तिच्या' प्रेमात
थोडासा मीही वेडा

रात्रीच्या त्या चांदण्यात
नागमोडी पायवाट
चंदेरी किरणांत
न्हायलि झाडी घनदाट

नदीच्या काठावर
नक्षीदार घाटावर
राटराणीचा मंद सुगंध
झुलुकेनीशी वार्‍यावर

अशात 'तिची' आठवण येते
अन् रात्र पूर्ण चंदेरी होते
आणि 'तिच्या' आठवणीतच
पुन्हा एकदा पहाट होते...

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

असावं... कुणीतरी आपलंसं...

प्रत्येकालाच वाटतं असतं
असावं कुणीतरी आपलंसं

आपल्याला काही सांगणारं
आपलं सारं ऐकनारं
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपली साथ देणारं

प्रत्येकाला असं कुणी
भेटतंच असं नाही
भेटलं तरी त्याचं सारं
पटतंच असं नाही

कधी वाटतं त्याने आपला
प्रत्येक हट्ट पुरवावा
खूप काही करूनसुद्धा
मागू नये परतावा

कधी होते जाणीव
केलंय त्यानं बरंच काही
मग मात्र आपण त्ययला
देऊ पाहतो सारं काही

असं कुणी भेटलं ना
की जीवनास येतो अर्थ
कारण, प्रत्येकवेळी एकमेकांचा
विश्वास ठरतो सार्थ...

कुणालाच कसं कळत नाही..

कुणालाच कसं कळत नाही..
कुणीच कसं ऐकत नाही..
 हे असं का होतंय
हे मात्र समजत नाही..

या आधीही होतेच की सगळे..
(अन् कदाचित..)... यानंतरही असतील सगळे..
पण मग आजच काय झालय यांना?

आजच तर खरी गरज यांची
आजच तर हवीय मदत यांची..
उद्या नाही मागणार काही
यापूर्वीही मागितलं नाही..

उलट, सतत यांचे लाड पुरवले..
तेव्हा सगळ्यांनी मित्र म्हणवले..
मग स्वतःवर वेळ आल्यावर
यांना त्याची आठवण का येत नाही?

नाही तुमची मदत मिळाली
तरी.. लढू शकतो स्वतः ही
एकटाच उभा राहीन
अं सहन करेन सारं काही.

पण... आजपर्यंत ज्यांना 'आपलं' म्हटलं,
आजपर्यंत ज्यांना जवळ केलं...
त्यांच्यालेखी मी... कोणीच का नाही??

चिडली.. की ती इतकी चीडते..

चिडली.. की ती इतकी चीडते..
जणू जन्माचे नाते तुटावे..
पण.. मला मात्र माहीत असते..
हा राग लाडीक आहे..
कधी जणू ती निघूनच जाते..
कधी कधी तर मौनही धरते..
तरीही जाणीव आहे माजला..
प्रीत ती माझ्यावरतीच करते..

कविता करायला म्हणे


कविता करायला म्हणे काही खास लागते...
शब्द, भाव आणि मनात कोणाची ओढ लागते..
यमक फक्त जुळले की चालत नाही..
नुसते भाव व्यक्त करूनही चालत नाही..
त्यात असावे लागते प्रेम.. कोणावारही..
अगदी कोणावारही..
त्याच प्रेमाटून येतात भाव.. सापडतात शब्द..
जुळतात यमकं आणि मग होते त्याची कविता..
पाहता डोळ्यात तिच्या
सार विश्व दिसे मला..
नेत्रकडा तिची असे
जणू चंद्राची कला


ओठ भासती तिचे
जणू दाणे डाळिंबाचे
स्पर्शाने केवळ त्यांच्या
मज ओठी मधु साचे

गाल तिचे, जणू...
गुलाबी पाकळ्याच त्या
स्पर्शल्या त्यांना तिच्या
अंगूल्याही लाजलेल्या

अश्या रूपातून त्या
जेव्हा "इश्य्य" ऐकू येते...
रोमांच येतो अंगी
मन मोहरून जाते...

वाटे लुटावी सारी
दौलत जगिचि तिच्यावरी
तरीही राहील आणखी
काही लुटायाची इच्छा उरी..

बुधवार, २० जानेवारी, २०१०

कवितांच्या मैफलीत माझ्या

 कवितांच्या मैफलीत माझ्या
केवळ प्रेम स्वप्नेच नव्हती..
होते थोडे दुःखही विरहाचे
थोडी वास्तवताही होती...

नव्हत्या केवळ आणाभाका
किंवा  नव्हत्या केवळ राती...
होत्या मातितल्या भेगा
अन् होती काही नाती...

मैफल होती परिपूर्ण परि..
ऐकण्यास कोणी नव्हते...
मी नि कविता दोघे संपलो.. परि..
पाहण्यास कोणी नव्हते...
_____________ViNnY_____

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

तजेलदार चहा

तजेलदार चहा प्यायची तल्लफ आली आणि सकाळी सकाळी बाहेर पडलो....
बाहेर पडताच लक्षात आले, "आज थंडी वाढलीय बरं!".
एवढंच फक्त मी आमच्या हिला म्हटलो.. बाहेर पडता पडता... तर म्हटली... "थांबा जरा"...
विचारले तिला.. "काय गो अचानक थांबा म्हटलीस ते?"
तेवढ्यात आत जाउन पटकन तिने स्वेटर आणला आणि माझ्या हातात दिला...
म्हणाली, "स्वेटर घालून जा... उगाच सर्दि व्हायची नाहीतर... "
तिला म्हटले.. "अगो वेडे मी आजवर कधी स्वेटर वापरलाय का?"
तर म्हणते कशी, "अहो, पण घाला आता... आपलं वय झालंय.. पूर्वीसारखी तब्येत साथ द्यायची नाही हो..." तरीही हट्ट करून मी स्वेटर ना घेता तसाच बाहेर पडलो...
घरासमोरच असलेल्या सोसायटीच्या बागेत थोडावेळ बसून मग पुढे जऔ असे काहीसे वाटले आणि सरळ बागेत शिरलो... बागेत जाताच जाणीव झाली.. हवेतल्या धुक्याने केलेल्या जादूची...
गवताच्या प्रत्येक पानावर त्याने एक एक थेंब जणू अगदी अलगद ठेवून दिला होता...
 स्पर्श होताच ते दवबिंदू अगदी अंगाशी सलगी करून, हळूच ओघलून खालच्या गवतात पुन्हा मिसळून जात होते. आणि एक सुखद गारवा अगदी नसा-नसात भिनवत होते. मग काय.. चप्पल काढून हातात घेतली आणि तसाच अनवानि चालू लागलो.
हलू हलू गारवा वाढत होता. थोडीफार थंडी बोचू लागली. तरीही मी तसाच पुढे चालत होतो...
बागीचा संपला आणि पुढे रस्त्यावरची टपरी दिसली. परंतु, मला मात्र आता रस्थयापलीकडाची टेकडी खुणावत होती. धुक्याची चादर लपेटून अंगावरच्या हिरव्यागार वनराईमुळे सुखावलेली...
परत येताना चहा घेऊ म्हणून सरळ टेकडीवर चढून गेलो. आज वारा काय मस्त सुटला होता..
त्यातून ही मस्त धुक्याची चादर... काय सुंदर वातावरण आहे. पण आजचा वारा काही वेगळाच..
पुर्वी मी अश्या वार्यात तासन्-तास बसून राहायचो.. पण आज काही हा मला सोसवत नव्हता..
म्हणून काहीश्या अनीच्छेनेच मी घराकडे परतु लागलो.. येताना कोणत्यातरी विचारात इतका गुंग झालो..
की सरळ दारात येऊन थांबलो... बेल वाजवतच होतो, तेवढ्यात एक शिंक आली..
झाले... शिंक आली.. आणि मागून आमची ही आली... "काय हो आलात? आत्ताच झाडांना पाणी घातले.. आणि हे काय? शिन्कताय? तरी सांगितले होते तुम्हाला.. स्वेटर घेऊन जा.. पण ऐकनार नाही... चला आत... एक चहा करून देते आल्याचा... तो घ्या आणि झोपा शांत.. बरं वाटेल जरा..."
     मग काय बसलो वाट बघत चहाची... चहा घेतला आणि स्वेटर घालून गॅलेरीत येऊन बसलो...
तेवढ्यात आमचे शेजारी बागेतून येता येता म्हटले... "काय हो, आज गॅलेरी? काय करताय?"

"काही नाही... तजेलदार चहा पितोय... आमच्या हिच्या हातचा..."

अशी ती.... माझी आई...

ती...
जिने मला जन्म दिला...
जिणे या जन्मातील प्रत्येक क्षणाला
एक नवा अर्थ दिला..
या धरेवर पहिले पाउल टाकण्याचा अनुभव दिला..
आणि त्याहूनही... पुढे प्रत्येक पावलावर...
काहीतरी नवीन शिकण्याचा छन्द दिला...

ती...
जिच्याशिवाय मी अधुरा...
जिच्या केवळ उल्लेखानेही...
जगातील... प्रत्येक जन्म होतो पुरा..
जिने या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात काही दिले..
आणि इतके देऊनही कधी...
काहीच न मागितले...
अशी ती....
माझी आई...

पुन्हा ती....

पुन्हा.... "ती"च...

आता तुम्ही म्हणाल ही "ती" पुन्हा कशी?
आधीच स्पष्ट करतो... ही "ती" म्हणजे मला सोडून गेलेली नाही..
ही तर "ती".. जिला माझ्या बद्दल सारे काही माहीत असताना जिणे मला स्वीकारले... मला समजून घेतले, आणि माझा भूतकाळ पूर्णपणे माहीत असूनही माझ्यासोबतच आयुष्य काढायचे ठरवले... ती....



ती...
जिने मला सावरले..
जिने मला पुन्हा एकदा आयुष्य जगायला शिकवले..
जिने पुन्हा एकदा माझ्या पंखात बळ दिले...

ती...
जिला नेमके ठाऊक होते...
माझ्या भूतकाळात नक्की काय दडलंय...
त्यातूनही तिला नेमकं काही असं सापडलंय...
ज्यामुळे मला नेमका मार्ग मिळाला..
आयुष्य पुढे नेण्यासाठी...
जिने प्रत्येक पावलावर काही असे दिले...
ज्याने मला काही क्षण दिले...
आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी...

ती...
तीच तर आहे आता माझे भविष्य...
तीच तर आहे माझे सारे आयुष्य...
केवळ तिच्यासाठीच प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते...
ती रूसळी.. वा समोर जरी नसली...
तरीही मनी भीती दाटते...
ती... मला सोडून जाण्याची..
अगदी खात्री असूनही... की ती जाणार नाही..
कधीच....

ती...

ती...
कधी तिच्यासाठी मी अनेक कविता केल्या..
कधी तिच्यासाठी संपूर्ण आयुष्यही देण्याची तयारी केली..
कधी तिच्यासाठी संपूर्ण जगाशी वैर घेण्याचीही उर्मि दाखवली..
ती...
अगदी माझा श्वास.. तो थांबला
तर जणू माझे जीवनच संपून जाईल
अशी भीती वाटायची .. अशी.. ती..
ती...
जिच्यामुळे आयुष्याला एक वेगळेच वळण लागले..
जिच्यामुळे एक नाइव जीवनच जणू लाभले..
जिच्या केवळ एका होकारानेच प्रत्येक गोष्टीतले सुख मिळाले..

ती...

तिने खरेच माझे जीवन संपूर्ण बदलले..
ती नाहीए आता माझ्यासोबत..
परंतु अजूनही एक जाणीव आहे खोल कुठेतरी अंतर्मनात..
की तिच्यामुळेच केवळ मी आज जीवनात खूप काही करू शकलो.
तीच खर्या अर्थाने आजच्या "मी"ची खरी शिल्पकार...
सत्ता मिळवण्यात जेव्हा
गुणवत्ता कमी पडते
त्या प्रत्येकवेळी.. लोकशाही हरते..
केवळ पैसा नि सत्तेच्या जोरावर
जेव्हा राजकारणाची दिशा ठरते..
तेव्हा ही लोकशाही
पुन्हा एकदा मरते..
अशीच असते का लोकशाही..?
हरणारी नि मरणारी?
इतकी रोज मरूनसुद्धा
कशीबशी जगणारी?
असे वाटत असतानाच
कधी लोकशाही पेटूनही उठाते
आणि तेव्हा मात्र
सार्‍या सत्ताधार्यांची बोबडी वळते..
कारण, त्यांना ठाऊक असते..
लोकशाही काय चीज आहे..
प्रलयनकारी पाउस किंवा
कदादणारी वीज आहे...
म्हणून तर या लोकशाहीला
कोणी डोके काढू देत नाही..
कारण, तसे केल्याशिवाय जनता..
राजकारण्यांना भीत नाही...
थंडी इतकी वाढलीये
की सारी शाईच गोठून गेलिये...
मनातली प्रत्येक संवेदनाही जणू...
या थंडीने गारठून गेलिये..

म्हणूंच बहुदा यायला तिला
झाला असावा उशीर...
पण काय करू.. थंडीच इतकी..
आता धरवत नाहीए धीर...

तिच्या येण्यानेच बहुदा आता
निसर्गात बहार येईल...
तिच्या येण्यानेच बहुदा आता..
मिठी माझी उबदार होईल....
प्रेमात तर असतोच माणूस आयुष्यभर...
आकांत बुडालेला..
कधी तो आईच्या पदराच्या...
कधी नवे चमचमीत मागणार्‍या आपल्याच उदराच्या..
कधी धुंध करणार्‍या मदिरेच्या
कधी क्षुब्ध होऊन रुधिराच्या...

प्रेमात पाडतोच मनुष्य..
अगदी रोज..
कोणाच्या ना कोणाच्या,
इतकेच की ते कधी टिकते क्षणापुरते..
कधी त्याला आयुष्यही न पुरते...

प्रेम करतोच प्रत्येकजण..
कधी सजीवावर... निर्जिवावर...
कधी या सार्‍याच निसर्गावर...

प्रेम कधी चुकत नाही बरे...
कोणालाच...
आणि ते मिळतही नाही सहसा.... प्रत्येकालाच...

कारण, प्रेमात पडल्यावर
त्याची जाणीव व्हायला हवी..
आणि ती व्हायला... आपण..
आपल्याच मनाला.. जरा.. मोकळीक द्यायला हवी...

प्रेम? हे काय असतं?

प्रेम? हे काय असतं?
मला नाही ठाऊक..
मला इतकाच माहीत...
की ती नसताना माझा जीव का जाणे.. व्याकुळ होतो..
तिच्या एका नजरेसाठी...
मी अगदीच अगतिक होतो...
कधी ती समोर असते, तेव्हा अगदी
हरवून जातो...
कोणास ठाऊक कोण्या आसमन्तात भटकत असतो..
तिच्या केवळ येण्यानेच जणू
सारी सृष्टी बदलून जाते...
प्रत्येकवेळी काही नवी दृष्टी देऊन जाते..
असाच मग मी काही बाही लिहीत राहतो
तिच्यासाठी...
ती नसताना आठवत राहतो.. आमच्या भेटीगाठी..

यालाच प्रेम म्हणत असतील,
तर मला ठाऊक नाही..
एक मात्र खरं...
तिच्याशिवाय माझी कल्पना...
मलातरी करवत नाही..

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

एकदा का मनाला पंख फुटले
की ते उडायला लागतं...
अगदी कल्पनेच्या जगातल्या
कोणत्याही कोपर्‍यात नेऊन
आपल्याला सोडायला लागतं..
आणि मग तेथून परत येताना
तेच काही शब्द देऊन जातं...
प्रत्येक शब्द बसू शकेल अशी
एक छानशी यमकाची पेटी देऊन जातं..
आपण फक्त प्रत्येक शब्द
त्या त्या चौकटीत बसवयचा..
की त्याची होते एक सुंदरशी कविता...
जरा जग फिरवून आणतो तुला...
मग सांगतो.. तुझ्या कोणत्या अदेला नक्की भुललोय ते...
म्हणजे बघ तो ताज महालसुद्धा
तुझ्या रंगासमोर कसा सावळा दिसू लागलाय...
आणि तुझ्या चरित्र्याच्या उंचीसमोर
तो आयफेल टॉवरही कसाखुजा वाटू लागलाय...
तुझ्या हास्याच्या खळखळाटासमोर
तो नायगारा फॉलही कशा अगदीच चीडीचूप राहतो...
तुझ्या नजरेच्या तेजाने
अगदी सार्‍या जगातील तारेच जणू किलकिलु लागलेत..
तुझ्या कल्पनेच्या उडी पुढे
चीनच्या भिंतीचे अंतरही अगदी नगण्य वाटू लागले आहे..
आता तूच सांग कोणती आहे अशी तुझी अदा..
ज्यावर मी भूलू शकत नाही?
तुला तरी सापडतय का काही?
पहाटेची हूडहूड, वार्याची मंद गती...


विझलेल्या शेकोट्या नि भिजलेली माती..

दवाचे मोती... धुक्याची चादर...

चुलीची उब किंवा आईचा पदर....

हळूच उघडणारे किलकिले दार...

हौशी पहिलवानांनी भरलेला पार...

कौलातल्या झरोक्यातून येणारा

उन्हाचा इवलासा कवडसा..

घरातल्या नव्या जोडप्याने

शोधलेला आडोसा..

मध्येच येणार्‍या झुलुकेने

तिच्या सर्वांगावरचा शहारा...

त्यातून वाचण्यासाठी

त्याच्या मिठीचा पहारा...

गुलाबी थंडीत सृष्टीचा न्यारा रंग

तेवढ्याच गुलाबी प्रेमात तेही दोघे दंग....

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

असंच होतं..


मी सोबत असलो की ती माझ्याकडे पाहतही नाही..
आणि दूर गेलो की म्हणते.. तुझ्याशिवाय राहावत नाही..
जेव्हा म्हणतो तू खूप सुंदर दिसातेस..
ती म्हणते तू ख्तां बोलतोस..
आणि जेव्हा काहीच म्हणत नाही तेव्हा म्हणते.. तुला माझी कदरच नाही..
मी जेव्हा जेव्हा तिला आठावू पाहतो,
टी नेहमीच वेगळी आठवते..
जेव्हा तिच्या जवळ असतो.. ती दरवेळी नवीच भासते..
तिचे सारे असेच असते..
अनपेक्षित.. अगदी.. अनपेक्षित..
तरीही तिच्यासारखी तीच..

एक प्रश्न माझ्यातल्या कवीला..


तिच्या आठवणीत मी लिहिल्या कविता..

पण नाही जमलं ती असताना काही..
अगदी थोडं जरी जमलं असतं.. तेव्हा..
आज ती इथे असती..
मग लिहिल्या असत्या तिच्यावरच्याच कविता
अगदी तिच्या समक्ष..
अं केले असते राजी तिला अगदी विश्वंतापर्यंत साथ देण्यासाठी..
पण कदाचित नव्हते नशिबी तिचे माझ्या सोबत रहाणे..
राहिली ही असती ती कदाचित पण..
मग.. खरंच मी कवी झालो असतो??
दणके देऊन सत्ता हलवण्याचा
जमानाही गेला,
सत्तेसाठी, जो तो स्वतः
विकलाही गेला

तत्वे सत्वे येतातच
नेहमी सत्तेच्या मुळाशी
देणे घेणे केवळ सत्ता
ना कोण्या कुळाशी..

विरोधकांना एकच काम
केवळ विरोध करणे..
सत्तधारी मात्र पाहती,
खिसे स्वतःचे भरणे

आज आम्ही तर उद्या
तुम्ही वाटून घेणे आहे,
दणके सोडा, कामे करा ..
अन्यथा
हा महाराष्ट्र विकणे आहे...
कितीक आले, कितीक गेले आम्हा घालवण्यासाठी,
कोणासाही जमले नाही आणि जमनारही नाही,
पक्ष कोणताही असो, आम्ही तिहे तुम्हा दिसू
कोठूनही हलवता आम्ही पुन्हा नव्याने वसू...
वृत्ती आमची अशीच की कोणीही वंदन करी...
आम्ही कोण म्हनुनि काय पुसता आम्ही "सत्ताधारी"
अरे.. लाखांनी येतील असे प्रस्ताव, विरोधात आमुच्या,
तरीही दाखवू आसमान तुम्हा , जर जाल वाट्याला आमुच्या..
नका करू धाडस असले, उगा कशाला वैर...
सत्ता आमुची, ताकद आमुची, कोण देईल तुम्हाला धीर?


(समस्त सत्ताधार्यांच्या वतीने एक माजयुक्त संदेश... समस्त समाजास.. ... )
मोठा तर मी तेव्हाच झालो..
जेव्हा झाली जाणीव..
कोणीतरी असावे लागते,
आयुष्य पूर्ण होण्यासाठी..
पण मग "ती" भेटली..
सारे काही अगदी व्यवस्थित जमले
आणि वाटले आपण मोठे झालो..
थोडक्यात काय,
पुन्हा एकदा वाटले जणू हीच ती वेळ..
आपण मोठे झालो त्याची..
आणि असे वाटत असतानाच
अचानक सारे जगच जणू विरुद्ध उभे ठकल्याची...
तेव्हा पूर्ण ताकदिनशी सामोरा गेलो सर्वांना.. केवळ तिच्यासाठी..
तेव्हा वाटले पुन्हा एकदा .. आपण मोठे झालो..
पण अचानक, एक दिवस 'ती' मला सोडून गेली..
तेव्हा मात्र अगदी लहान मुलासारखा राडलो..
अगदी एकटाच..
पब हलू हलू त्याचीही सवय झाली..
इतकी की कितीही मोठे दुःख आले तरीही दगमगलो नाही..
तेव्हा मात्र खात्री झाली.. मी खरेच मोठे झाल्याची..
आयुष्यात खूप काही अगदी
मिळाल्यासारखे वाटते
पण त्याच वेळी नेमके आयुष्यावर
अनिश्चिततेचे सावट दाटते..
ते इतके गहिरे होत जाते
की आपण सार्‍याच आशा सोडून बसतो..
आणि आपल्या सर्वात आवडत्या गोष्टीही गमावून बसतो..
तोच क्षण महत्वाचा असतो प्रत्येकसाठी..
आपले आयुष्य ताकदिनिशि
भांडून परत मिळवण्यासाठी..
इथे जर हारलो तर मात्र आयुष्य संपून जाते..
अन् जिंकलो तर मात्र आपण
ध्रुवाप्रमाणे अगदी नभात सर्वोच शिखरावर जाउन बसतो

आम्हाला वेगळं व्हायचय...

भारत, एक प्राचीन देश. तसा देश आत्ताचा पण प्राचीन प्रदेश... म्हणता येईल.. अगदी खंडप्राय देश असेही म्हणता येईल... तर या खंडप्राय प्रदेशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अगदी रामायण-महाभारत, वेद-पुराणांपासुनचा.. अगदी जेव्हापासूनाच्या कथा-दंतकथा, कागदपत्रे, भौगोलिक पुरावे या सर्वांतून लक्षात येते, की या देशात अनेक राज्ये होती. आणि ती गेल्या हजारो पिढ्यांमध्ये अनेक राज-घराण्यांकडे होती. अगदी, हैदराबादच्या निजामाचा पाडाव होईपर्यंत. आणि त्यानंतर भारत पूर्णतः एक झाला. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारिपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत. भारत स्वतंत्र झाला. त्यात भाषेच्या आधारावर प्रांत पाडले गेले. सारे काही ठीक चालू असतानाच पुन्हा काही क्षेत्रीय नेत्यांनी, सामाजांनी, आपल्यावर अन्याय होत असून आम्हाला वेगळे राज्य हवे अश्या मागण्या सुरू केल्या. त्याचीच परिणती, झारखंड, छत्तिसगड अश्या राज्यांच्या उदयात झाली.

बरे, हे सारे एवढ्यावर थांबलेले नाहीए.
उत्तर-पूर्वेत, बोडोराज्य,
उत्तरप्रदेशात - हरितप्रदेश, पूर्वांचल. एवढेच काय तर उत्तर-प्रदेश, बिहार, छत्तिसगड येथील काही भागांचे मिळून भोजपुर राज्यही केद्र-शासनाकडे प्रस्तावित आहे.
मध्यप्रदेशात - बुंडेलखांड
बंगाल मध्ये - गोरखाराज्य, ग्रेट न्यू कूच बिहार
आंध्रप्रदेशात - तेलंगाणा
कर्नाटकात - कुर्ग, तुलुराज्य
महाराष्ट्रात - विदर्भ, कोकण (स्वतंत्र कोकणराज्य पक्षसुद्धा आहे), मग कदाचित मराठवाडा, खानदेश...
तामीळनाडूमध्ये - वानमाई - यात कर्नाटक, आंध्र, आणि तामीळनाडू यांच्या एकत्रित सीमारेशेवरील 'वेन्नियार' लोक एक वेगळ्या राज्याची मागणी करीत आहेत.
गुजरात- सौराष्ट्र.
बिहार - मिथिलांचल.
राजस्थान - राजपुताना


ही यादी अशीच वाढत जाणार काय?
यापैकी १० राज्यांचा प्रस्ताव आत्ताच केंद्रशासनाकडे आलेला आहे.
आपण पुन्हा एकदा जुन्या भारताकडे चाललो आहोत काय? याचे परिणाम काय होतील? भारत एक देश म्हणून अस्तित्वात राहील?

नक्की कशामुळे होतेय हे सारे? राजकारण? लोकांची इच्छा? की आणखी काही?

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

आठवण आपल्या गावाची..

कधी कधी यायलाच हवी
आठवण आपल्या गावाची..
पारावरच्या हनुमंताची नि
देवळातल्या महादेवाची
शहरात करताना चाकरी...
दिसावे डोळ्यासमोर ते कौलारू घर..
जिथे मिळायची चटणी-भाकरी
विनवायची आजी जेवून घे लौकर..
कालवा, नदी, आणि कधी तलाव तो..
भरायचा संध्याकाळी सवंगड्यांनी...
दणानून जायचा परिसर
एकमेकांच्या हाका - आरोळ्यानी
आठवावी शाळा चाळवजा ती
जिथे खाल्ली होती कधी छडी
आठवावी कधी पळून जाताना
खिडकीतून घेतलेली उडी..
कधी आठवावी एखादी
सखी लहानपणीची..
आठवावी भाण्डणे ती लुटूपुटूची
अन्... आठवावी छुपी भेट आपली नि तिची..
आठवावी हाक आईची...
ताईची.. सवंगड्यांची.. गाव सोडतानाची...
अशानेच राहते ओढ कायम...
आपल्या मायभूमीची...

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....

ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....
आणि मस्तपैकी त्या सजवून मला भेट कर...
कवितेचा विषय काहीही असो,
मी त्याच्यात दिसायला हवी....
प्रत्येक कवितेत मात्र
उपमा मिळावी अगदी नवी..
एवढे सगळे ऐकल्यावर
मला काहीच सुचेना..
कविता सोडा....
साधी चारोळीही जुळेना..
अहो, का म्हणून काय विचारता...
तीही खूप सुंदर आहे....
शब्दही तसे खूप आहेत...
पण तिचे पुरेपूर वर्णन करायला
सगळे मिळूनही अक्षम आहेत...
यु शबनमी एह्सास था उनके आने से....
के हर साँस महक उठी....
हवाओने फिर कहा जरा रूको...
तुम्हारे सांसो में मिलने से पहले जरा...
मुझेभी मदहोश होने दो इन एहसासोमें...
कॅनव्हास वरचा एखादा रंगाचा फटकाराच
काय तो सारे चित्र बदलून जातो...
तसाच काहीसा एखादा थोडासा वेगळा विचार
मनातील भाव सजवून जातो...
धोंडा म्हणता होतो
पायवाटेवरील अडचण जो...
शेंदुर फासता त्यालाच
येणारा प्रत्येकजण
वाकून नमस्कार करून जातो...

_____________ViNnY_____________

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २००९

मनावरही होते घाव माझ्या
भेसूर दिसाया लागले..
झाकले ते क्रुत्रिमतेने...
तेव्हा... आतून दुखाया लागले..
दुनियस परी वाटत होते...
घाव सारे भरून गेले..
सत्य मात्र निराळेच होते..
घाव माझे जिवंत तरीही
बाहेरून ते मरून गेले...

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

एक प्रश्न माझ्यातल्या कवीला..


तिच्या आठवणीत मी लिहिल्या कविता..

पण नाही जमलं ती असताना काही..
अगदी थोडं जरी जमलं असतं.. तेव्हा..
आज ती इथे असती..
मग लिहिल्या असत्या तिच्यावरच्याच कविता
अगदी तिच्या समक्ष..
अं केले असते राजी तिला अगदी विश्वंतापर्यंत साथ देण्यासाठी..
पण कदाचित नव्हते नशिबी तिचे माझ्या सोबत रहाणे..
राहिली ही असती ती कदाचित पण..
मग.. खरंच मी कवी झालो असतो??

सखे........

दिला.. .सखे.. पूर्ण जन्म दिला..
जव्हा वाटेल तेव्हा ये...
मी इथेच असेन.. अगदी इथेच..
वाट पहिन तुझी....
अगदी सूर्य जाळून खाक झाला..
चंद्र विझून काळा झाला..
पृथ्वीवर प्रलय आला..
तरी मी इथेच असेन..
तू पुन्हा येईपर्यंत..
दिला.. सखे.. पूर्ण जन्म दिला..
एक दिवशी एकटाच भटकत होतो..
काहीतरी अजानते शोधत होतो..

ठाऊक नव्हते मलाच माझे
हवे काय होते..
पण तरीही दही दिशाना जाऊन
धडकत होतो..

अचानक वाटले सापडली दिशा..
मी तसाच पुढे गेलो..
पण मृगजळ होते.. पुढेच.. थोडे..
मी तसाच परतही आलो..

कधी कळेना मिळेल दिशा मज..
कधी कळेना सापडेल ध्येय मज..
असाच कधिपर चालत राहू..
उगाच कशा कुणाची वाट पाहु?

वाटते कधी मज संपावे जग
वाटते कधी संपावे जीवन..
प्रवास हा जर संपत नाही.
जगण्यातही उरला राम नाही..

दूर देशी जाताना....

दूर देशी जाताना ती भेटली होती..
विसरणार नाही कधी तुला.. ती म्हणाली होती..
म्हणालो तिला आहे खरोखर तुझ्यावर विश्वास माझा..
जओन येतो परदेशी मग होईल तुझा राजा..
ती ही म्हणाली पाहीं मी वाट तुझी..
याच वाचनावर मी सार्‍या विश्वभर फिरलो..
तिच्यासाठी भेटी घेऊन माघारी आलो..
.... पण... परत आलो नि समजले..
मी तिचा कधीच नव्हतो.. राजा कसला,
मी तर तिच्या मनातही नव्हतो..

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

किल्ले तोरणा... उर्फ प्रचंडगड


तोरणा... शिवरायांनी हाच किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरं बांधले असे म्हणतात... अर्थात त्याआधीही राजांकडे काही किल्ले होतेच... परंतु, स्वराज्यस्थापणेची खरी सुरूवात तोरणा किल्ल्यापासून झाली... तोरणा हे नाव पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे गडावर आढळणारी तोरणा जातीची वनस्पती... गरूडाचे घरटे.. असे बिरुद मिरवणारा हा किल्ला... या किल्ल्यावर मी आजवर ३ वेळा जाउन आलोय... सर्वात आधी कॉलेजच्या मित्रांसोबत... म्हणजे जवळपास ५ - ६ वर्षांपूर्वी.. आणि त्यानंतर... ओक्टॉबर २००८ आणि मार्च २००९ मध्ये. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन दाखवणारा हा किल्ला... अगदी कोणत्याही वातावरणात अतिशय थंड वारे आणि प्रचंड पसराल्याने प्रचंदगड हे नाव सार्थ करणारा... हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात. तालुक्याच्या ठिकाणीच... साधारण ४००० फुट उंची असलेल्या किल्ल्यावर जायला सद्ध्या एकाच रस्ता वापरात आहे... तो म्हणजे वेल्ह्याहून... आणि हो राजगडावरून येणार्‍या डोंगररांगेहूनही या किल्ल्यावर प्रवेश करता येतो... या किल्ल्याचे मुख्यत्वे दोन भाग आहेत... एक आहे तो झुंझारमाल मचीपासून कोकण दरवाजा किंवा हत्तिमाळ बुरुजापर्यंतचा... आणि दुसरा भाग.... हत्तिमाळ उतरून खाली जाउन कोकणबाजू पर्यंत... याच भागात बुधलामाची वाघ दरवाजा, राजगडची वाट ई. ठिकाणे आहेत...

http://picasaweb.google.com/veebee009/TornaMarch09#
http://picasaweb.google.com/veebee009/Torna02#

मत तरुणाई चे... भविष्य भारताचे..

भारत… जगातील सर्वात तरुण देश. .सर्वात जास्त तरुणाई ने भरलेला देश.. जगातील सर्वात जास्त पोटेन्षियल असलेला देश… तरुणाई.. जगाच्या इतिहासात जी काही क्रांती झाली ती तरुणांनी केली.. मोघलाई, आदिलशाही उधळली एका तरुणानेच.. जग जिंकलेला सिकंदर, नेपोलियन.. हे ही तरुणच होते.. जगात क्रूरता आणि अतिरंजित राष्ट्रभक्ति गाजली ती हिट्लर मुळे.. अगदी फ्रेंच राज्यकरंती पासून क्यूबन क्रांती पर्यंत.. भारतीय स्वातंत्र्य युद्धपासून ते जपानच्या अणुस्फोटनंतरच्या प्रगतीस कारणीभूत आहे ती तरुणाई..

ओरकुत.. एक अशी जागा जिथे सर्वात जास्त तरुण लोक असतात.. जिथे कळू शकते की नक्की तरुणाई ची मते काय आहेत.. अनाई हे वर्ष 2009 आहे.. निवडणुकांचे.. राजकारण.. बरेच लोक नाके मुरडतात याच्या नावाने.. पण.. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हाच आहे द फॅक्टर.. जो ठरवतो की तुमचा देश कुठे जाणार.. आणि निवडणुका हे एक चांगले माध्यम.. सगळ्यांसाठी.. सांगायला की आपल्याला नक्की काय हवाय..

हीच वेळ आहे आपले मत मांडण्याची.. हीच वेळ आहे जगाला पुन्हा दाखवायची की होय.. आम्हीच आहोत या जगाचे शिल्पकार..

मी असे नाही म्हणत की फक्त मत द्या... मत दिले की आपली जबाबदारी संपत नाही.. उलट सुरू होते.. आणि त्यानंतर माहितीचा अधिकार आहे.. 49 ओ सारखा नाकारार्थी मताचा अधिकार आहे.. वापर करा.. पण हे करायला वेळ नाही देत आपण.. हाच तर प्रॉब्लेम आहे ना.. उदाहरण च द्यायचे तर.. माझ्या गावी कोकणात आम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर सुरू केला आणि किती तरी कामे पटापट होऊ लागलियेत.. लोकप्रतिनिधी काम करतात पण.. त्यासाठी नागरिक म्हणून आपण ही जागरूक राहून त्यांची कामे नीट होतात की नाही याची काळजी घ्यायला हवी.. त्यासाठी निवडणूक लढवलीच पाहिजे असे काही नाही.. अर्थात जर तशी तयारी असेल तर उत्तमच नाही??
लोक फक्त मतदानाला जातात.. मग निवडणुका लढवणे वगैरे तर लांबची गोष्ट आहे.. हे म्हणजे आधी देवळात जायलाच लोक नको म्हणतात तर देवाची पूजा कशी होणार??? मग उगीच ओरडत राहायचे.. बडवे लुटतात म्हणून.. आणि आणखी एक.. सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे लोकांना जाणीव करून देण्याची.. त्यांचे मत किती महत्वाचर आहे याची.. त्याहून ही त्यांना शाषणाच्या विविध योजना माहीत झाल्या पाहिजेत.. जेणेकरून लोक त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून घेतील..
मुद्दे काय ? बेकारी, गरीबी, आणि मूलभूत गरजा.. पाणी वगैरे.. पण मग शिक्षण पर्यावरण.. यांच्या बद्दल का नाही लोक विचारात?? सरळ आहे.. या गोष्टींसाठी तुम्ही काय करणार ते सांगा.. आम्ही तुम्हाला मत देऊ..
. पण आजची तरुणाई काय विचार करते हे जाणून घेण्याचा.. तेव्हाच कळेल की किती गरज आहे.. ब्रेन वॉश ची.. किंवा कितपत माहीत आहे लोकांना या सर्वांची..

आणि नेमके हेच महत्वाचे आहे.. नाहीतर लोक म्हणतात की तुम्ही प्रचार करताय.. प्रक़चार तर करावाच.. पण फक्त लोकशाही चा.. मतदानाच्या अधिकारांचा.. त्यातल्या काही माहीत नसलेल्या गोष्टींचा.. लोकांना विचार करायला आणि आपले मत अगदीयोग्य माणसास देण्यासाठी मदत होईल अश्याच मुद्द्यांचा..

मान्य की फक्त बोलून काही होत नाही.. पण एखाद्याला चिखलात उतरवण्यासाठी आधी त्याची मानसिक तयारी करावी लागते.. त्याशिवाय तो पुढे जातच नाही.. आणि करियर धोक्यात घालायचीच गरज आहे असे कोणी सांगितले..

वैयक्तिक च सांगतो.. मी ज्रव्हा वेळ मिळेल तेव्हा लोकांना या सगळ्या गोष्टी सांगत असतो.. आणि हो.. जितका वेळ मिळेल तितका मी गावात जओन लोकांमध्ये मिसलण्यात घालवतो.. माझे क्षेत्र आहे गड किल्ले, इतिहास.. म्हणजे मला हे आवडते.. तेव्हा मी निद्दाअन त्यानुसार लोकांना आधी एकत्र आणून अथवा त्यांच्याशी जवळीक साधून मग आपले लोकशाही मतदान वगैरे विचार ऐकवतो.. बराच फरक पडतो याने..

रूप तिचे.......

तिचे रूप मी काय वर्णू..
दिसते कशी ते कसे सांगू....
शब्द ही पडतील अपुरे..
तरीही होणार नाही तिचे कौतुक पुरे..
चन्द्रालाहि हेवा वाटेल अश्या तिच्या पापण्या..
डोळे तिचे बोलके जणू सारे भाव मनीचे काळती...
कांती लजविते सूर्यालाही...
अन् वाणी तिची मधुर अमृत्ाहुनी..
तो : मी चिडलोय..
ती : चालणार नाही...
तो : का बरं?
ती : तो हक्क फक्त मला आहे.. तुला नाही..
तो : असे कुठे लिहून ठेवलय?
ती : नासू दे.. पण मी ठरवलाय ?
तो : हे मात्र बरोबर नाही.. तू चुकलिस तर मी चिदयाचा नाही?
ती : नाही..
तो : का ?
ती : कारण मी कधी चुकताच नाही..
तो : आता हे कोणी सांगितलं ?
ती : हे सुद्धा मीच ठरवलं....
तो : सगळं बरं तूच ठरवतेस ?
ती : हक्कच आहे माझा...
तो : आयला... म्हणजे.. सगळे हक्क तुलाच??
ती : असच काही नाही... तुला हवे ते तू कर.. माझ्यावर प्रेम कर.. मला खुश कर.. असाच सतत हसत राहा.. वगैरे वगैरे..
तो : ..... (काय बोलणार?? )

शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

असंच होतं..

मी सोबत असलो की ती माझ्याकडे पाहतही नाही..
आणि दूर गेलो की म्हणते.. तुझ्याशिवाय राहावत नाही..
जेव्हा म्हणतो तू खूप सुंदर दिसातेस..
ती म्हणते तू ख्तां बोलतोस..
आणि जेव्हा काहीच म्हणत नाही तेव्हा म्हणते.. तुला माझी कदरच नाही..
मी जेव्हा जेव्हा तिला आठवू पाहतो,
ती नेहमीच वेगळी आठवते..
जेव्हा तिच्या जवळ असतो..
ती दरवेळी नवीच भासते..
तिचे सारे असेच असते..
अनपेक्षित.. अगदी.. अनपेक्षित..
तरीही तिच्यासारखी तीच..

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २००९

विश्वाचे गूढ.....


प्रश्ना विचारिता उत्तरासाठी
उत्तर सापडलेलेच असते...
केवळ करिता विचार थोडा कळते
उत्तर प्रश्णाताच दडलेले होते...
हाच विचार घेऊनी जेव्हा
प्रश्न विचारला जातो
तेव्हाच खरे प्रश्नकार्त्याला
या विश्वाचे गूढ उकलते....

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

जाणीव.....

येतो.. कधी कधी मलाही राग..
मस्तकात जाते तळपायाची आग..
पण तरीही मी थोडा स्वतःला सावरतो..
हे ही संकट जाईल असे स्वतःच समजावतो..
परष्टीतिशी झगडण्याचा..
थोडासा .. प्रयत्न ही करतो..
पण .... काहीच बदलत नाही..
म्हणून.. पुन्हा आपल्या कामाला लागतो..
हीच वृत्ती मराठी माणसाची..
त्याला घेऊन बुडाली...
तेव्हा त्याला स्वताच्या हक्काची जाणीव झाली..
मी ही तशाच साधारण की..
अगदी याच जगात वावरतो..
आता काहीतरी वेगळं सुचतं..
कारण.. हेच जग थोड्या वेगळ्या नजरेनं पाहतो..

भेट.... शेवटची..(?)...

आठवतय तुला??
त्या दिवशी काय झालं होतं ?
आपण भेटलो होतो. गावदेवीच्या देवळात...
खूप गप्पा मारल्या आपण,
खूप दिवसांनंतर..
पण.......
अचानक तू म्हटलीस -
"सांग काय करशील
जर मी नसेन आयुष्यात ?..
.. खरंच राहू शाक्शील..
माझ्याविणा.. या जगात? "
आणि मी म्हटलं होतं -
"खरं सांगू तुझ्यासाठी
नाही मी मारू शकत, पण...
आयुष्य मात्र तुझ्यासोबतच जगायाचाय.."
तू म्हटलीस -
"नाही मी येऊ शकत तुझ्यासोबत,
आणि जागूही नाही शकत, तुझ्याशिवाय...
म्हणूनच आहे आता एकाच पर्याय... मरणाचा"
माझं तर काळीजच थरथरलं,
आणि अचानक माझा हात उठला...
त्यानं तुला स्पर्श केला, पण...
तुझ्या गालावर मारण्यासाठी...
आणि... तू तशीच निघून गेलिस...
.. मागं वळूनही न पाहता.. मला सोडून गेलीस....
त्याचवेळी मी पुन्हा मेलो...
तुझ्या एका नजरेसाठी अगदीच आगतिक झालो..
... पण.. तू मात्र माझ्याकडे पुन्हा पहिलं ही नाहीस..
माझा मनात काय आहे.. ओळखलही नाहीस...
मी मात्र एकटा झालो..
कायमचा....
अगदीच.... एकटा..

संभ्रमात राहण्याची मजा........

संभ्रमात राहायची मजाच काही और असते..
कोणी खात्री पटावायची गरज नाही..
की कोणी पुरावा मागण्याची भीती नाही..
जे आहे ते सारे मनातच असते..
प्रश्न इतकाच.. की ते खरे की खोटे ??
हे मात्र माहीत नसते.. किंबहुना...
याचा विचार करण्याची ही जाणीव नसते..
म्हणूनच...
संभ्रमात राहण्याची मजाच काही और असते..

मी बी होतो.. हुसार…

मी बी होतो त्याच्यासारखाच हुसार…
अगदी उन्निस बीस चा फरक व्हता..
लाई मजा यायची.. सालंत..
मास्तुर प्रश्न इचारायचे नि आम्ही दोगांच उत्तरं द्यायचो…

मास्तर म्हणायचे..
तुमि दोग खूप पुढं जाणार..
आई बापाचं नाव मोटं करणार..
तो खूप शिकला.. लयी मोठा झाला...
आई बपाचं नाव काडलं..
आन् मास्तुरला बी खरं ठरवलं..

पण माझं मात्र आसं काईच झालं नाई..
माझ्या वाट्याला असं नशीब कधीच आलं नाई..
बा बेवडा अन् आई मोलकरीन..
बा मला मारायचा.. आई म्हणायची..
मी तुला म्होटा करीन..


एकदूम तो दिसला नि मनात इचार आला..
माजं बी आई वडील आसतं तर??
मी बी असाच मोटा झालो असतो..
आईला आराम मिळाला असता..
मी बा मग गप्प झाला असता..

आई बा च्या भांडणात एक दिस
आईचा जीव गेला..
आन् तिला मारलं म्हणून माझा बा तुरुंगात गेला..
दोघं बी गेले र्‍हायलो मी..
आता माझं बगायला होतो फक्त मीच..
आन् मी काय करायचं हे ठरवायला बी मीच..

हाती पडलं ते काम करत रायलो..
कासाची साला नि कसच काय..
दिवसभर काम करून बी..
पोट काय भरत नाय..
ह्म... हा झाला नेहमी चा प्रसंग..
तो म्हणतो : थांब ना..
ती : काही काम आहे??
तो : असायलाच पाहिजे??
ती : तसे नाही रे.. पण उशीर झालाय आता.. .
तो : ... उशीर झालाय म्हणे.. .आत्ताच तर आली होतीस...
ती : अरे पण...
तो : ठीक आहे बाई.. जा ...
ती : नको.. थांबते..
तो : जा की बाई..आता


(गंमत : भूमिका.. दोघांच्या.. क्षणात कश्या विरुद्ध झाल्या??? )