गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

कुणालाच कसं कळत नाही..

कुणालाच कसं कळत नाही..
कुणीच कसं ऐकत नाही..
 हे असं का होतंय
हे मात्र समजत नाही..

या आधीही होतेच की सगळे..
(अन् कदाचित..)... यानंतरही असतील सगळे..
पण मग आजच काय झालय यांना?

आजच तर खरी गरज यांची
आजच तर हवीय मदत यांची..
उद्या नाही मागणार काही
यापूर्वीही मागितलं नाही..

उलट, सतत यांचे लाड पुरवले..
तेव्हा सगळ्यांनी मित्र म्हणवले..
मग स्वतःवर वेळ आल्यावर
यांना त्याची आठवण का येत नाही?

नाही तुमची मदत मिळाली
तरी.. लढू शकतो स्वतः ही
एकटाच उभा राहीन
अं सहन करेन सारं काही.

पण... आजपर्यंत ज्यांना 'आपलं' म्हटलं,
आजपर्यंत ज्यांना जवळ केलं...
त्यांच्यालेखी मी... कोणीच का नाही??

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा