प्रेमात तर असतोच माणूस आयुष्यभर...
आकांत बुडालेला..
कधी तो आईच्या पदराच्या...
कधी नवे चमचमीत मागणार्या आपल्याच उदराच्या..
कधी धुंध करणार्या मदिरेच्या
कधी क्षुब्ध होऊन रुधिराच्या...
प्रेमात पाडतोच मनुष्य..
अगदी रोज..
कोणाच्या ना कोणाच्या,
इतकेच की ते कधी टिकते क्षणापुरते..
कधी त्याला आयुष्यही न पुरते...
प्रेम करतोच प्रत्येकजण..
कधी सजीवावर... निर्जिवावर...
कधी या सार्याच निसर्गावर...
प्रेम कधी चुकत नाही बरे...
कोणालाच...
आणि ते मिळतही नाही सहसा.... प्रत्येकालाच...
कारण, प्रेमात पडल्यावर
त्याची जाणीव व्हायला हवी..
आणि ती व्हायला... आपण..
आपल्याच मनाला.. जरा.. मोकळीक द्यायला हवी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा