शनिवार, ३० जानेवारी, २०१०

समुद्र.... कसा?

समुद्र.... कसा?
............असा की... तसा?
समुद्र.... कधी शांत... कशी रागीट...
............कधी अस्ताव्यस्त... कधी नीट...
............कधी धीरोदत्त.... कधी उतावळा....
............कधी निळा... कधी सावळा...
............कधी उद्धट... कधी प्रेमळ...
............कधी गहिरा... कधी नितळ...
............कधी आनंदी... कधी रुसवा..
............कधी सरळ... कधी फसवा...
............कधी राजा... कधी वैरागी...
............कधी भाग्यवंत... कधी अभागी...
............कधी साधक... कधी बाधक...
............कधी ओंगळ... कधी मादक...
............कधी शहाणा... कधी वेडा...
............कधी संपूर्णच... कधी थोडा...

एकदा भेटली मला... माझीच एक कविता...

एकदा भेटली मला...
माझीच एक कविता...
म्हणाली.... किती दुष्ट आहेस रे तू?
प्रत्येकवेळी मला तिच्या हवाली करतोस...
तिचे मन जिंकतोस आणि तिलाच मिठीत घेतोस...

म्हटले.... मला नाही समजले...
कविता तिच्यासाठीच तर होती ना?
मग तिलाच देणार ना?

तर म्हणते कशी....
इतक्यावेळा तू माझ्या मदतीने
तिला खुश केलंस...
प्रत्येकवेळी मी ही जाउन..
तुझ्या मनातलं सारं...
मी तिच्यासमोर व्यक्त केलं...
आणि त्याच मनातल्या गोष्टींनी..
तिनेही तुला आपलंसं केलं...

हे सारे होण्यासाठी तू मला किती सजवलंस...
प्रत्येकवेळी मला एक नवं नि सुंदर रूप दिलंस...

पण.... प्रेम मात्र फक्त तिच्यावरच केलंस...

..... म्हणून... दुसरे काय...?

कविता वाचून ती म्हणाली..
किती किती भारी ते शब्द..
मी म्हटले..
भारी नाही.. इथलेच आहेत..
आपल्याच आसपासचे..अगदी रोजचे..
मी थोडे धुवून साफ करून घेतले..
व्यवस्थित कवितेच्या मांडणीत लावले..
म्हणून ते सुरेख दिसताहेत.. दुसरे काय...

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

... पुन्हा एकदा पहाट होते..

थोडीशी ही रात्र वेडी
थोडासा तो चंद्र वेडा
आणि 'तिच्या' प्रेमात
थोडासा मीही वेडा

रात्रीच्या त्या चांदण्यात
नागमोडी पायवाट
चंदेरी किरणांत
न्हायलि झाडी घनदाट

नदीच्या काठावर
नक्षीदार घाटावर
राटराणीचा मंद सुगंध
झुलुकेनीशी वार्‍यावर

अशात 'तिची' आठवण येते
अन् रात्र पूर्ण चंदेरी होते
आणि 'तिच्या' आठवणीतच
पुन्हा एकदा पहाट होते...

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

असावं... कुणीतरी आपलंसं...

प्रत्येकालाच वाटतं असतं
असावं कुणीतरी आपलंसं

आपल्याला काही सांगणारं
आपलं सारं ऐकनारं
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपली साथ देणारं

प्रत्येकाला असं कुणी
भेटतंच असं नाही
भेटलं तरी त्याचं सारं
पटतंच असं नाही

कधी वाटतं त्याने आपला
प्रत्येक हट्ट पुरवावा
खूप काही करूनसुद्धा
मागू नये परतावा

कधी होते जाणीव
केलंय त्यानं बरंच काही
मग मात्र आपण त्ययला
देऊ पाहतो सारं काही

असं कुणी भेटलं ना
की जीवनास येतो अर्थ
कारण, प्रत्येकवेळी एकमेकांचा
विश्वास ठरतो सार्थ...

कुणालाच कसं कळत नाही..

कुणालाच कसं कळत नाही..
कुणीच कसं ऐकत नाही..
 हे असं का होतंय
हे मात्र समजत नाही..

या आधीही होतेच की सगळे..
(अन् कदाचित..)... यानंतरही असतील सगळे..
पण मग आजच काय झालय यांना?

आजच तर खरी गरज यांची
आजच तर हवीय मदत यांची..
उद्या नाही मागणार काही
यापूर्वीही मागितलं नाही..

उलट, सतत यांचे लाड पुरवले..
तेव्हा सगळ्यांनी मित्र म्हणवले..
मग स्वतःवर वेळ आल्यावर
यांना त्याची आठवण का येत नाही?

नाही तुमची मदत मिळाली
तरी.. लढू शकतो स्वतः ही
एकटाच उभा राहीन
अं सहन करेन सारं काही.

पण... आजपर्यंत ज्यांना 'आपलं' म्हटलं,
आजपर्यंत ज्यांना जवळ केलं...
त्यांच्यालेखी मी... कोणीच का नाही??

चिडली.. की ती इतकी चीडते..

चिडली.. की ती इतकी चीडते..
जणू जन्माचे नाते तुटावे..
पण.. मला मात्र माहीत असते..
हा राग लाडीक आहे..
कधी जणू ती निघूनच जाते..
कधी कधी तर मौनही धरते..
तरीही जाणीव आहे माजला..
प्रीत ती माझ्यावरतीच करते..

कविता करायला म्हणे


कविता करायला म्हणे काही खास लागते...
शब्द, भाव आणि मनात कोणाची ओढ लागते..
यमक फक्त जुळले की चालत नाही..
नुसते भाव व्यक्त करूनही चालत नाही..
त्यात असावे लागते प्रेम.. कोणावारही..
अगदी कोणावारही..
त्याच प्रेमाटून येतात भाव.. सापडतात शब्द..
जुळतात यमकं आणि मग होते त्याची कविता..
पाहता डोळ्यात तिच्या
सार विश्व दिसे मला..
नेत्रकडा तिची असे
जणू चंद्राची कला


ओठ भासती तिचे
जणू दाणे डाळिंबाचे
स्पर्शाने केवळ त्यांच्या
मज ओठी मधु साचे

गाल तिचे, जणू...
गुलाबी पाकळ्याच त्या
स्पर्शल्या त्यांना तिच्या
अंगूल्याही लाजलेल्या

अश्या रूपातून त्या
जेव्हा "इश्य्य" ऐकू येते...
रोमांच येतो अंगी
मन मोहरून जाते...

वाटे लुटावी सारी
दौलत जगिचि तिच्यावरी
तरीही राहील आणखी
काही लुटायाची इच्छा उरी..

बुधवार, २० जानेवारी, २०१०

कवितांच्या मैफलीत माझ्या

 कवितांच्या मैफलीत माझ्या
केवळ प्रेम स्वप्नेच नव्हती..
होते थोडे दुःखही विरहाचे
थोडी वास्तवताही होती...

नव्हत्या केवळ आणाभाका
किंवा  नव्हत्या केवळ राती...
होत्या मातितल्या भेगा
अन् होती काही नाती...

मैफल होती परिपूर्ण परि..
ऐकण्यास कोणी नव्हते...
मी नि कविता दोघे संपलो.. परि..
पाहण्यास कोणी नव्हते...
_____________ViNnY_____

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

तजेलदार चहा

तजेलदार चहा प्यायची तल्लफ आली आणि सकाळी सकाळी बाहेर पडलो....
बाहेर पडताच लक्षात आले, "आज थंडी वाढलीय बरं!".
एवढंच फक्त मी आमच्या हिला म्हटलो.. बाहेर पडता पडता... तर म्हटली... "थांबा जरा"...
विचारले तिला.. "काय गो अचानक थांबा म्हटलीस ते?"
तेवढ्यात आत जाउन पटकन तिने स्वेटर आणला आणि माझ्या हातात दिला...
म्हणाली, "स्वेटर घालून जा... उगाच सर्दि व्हायची नाहीतर... "
तिला म्हटले.. "अगो वेडे मी आजवर कधी स्वेटर वापरलाय का?"
तर म्हणते कशी, "अहो, पण घाला आता... आपलं वय झालंय.. पूर्वीसारखी तब्येत साथ द्यायची नाही हो..." तरीही हट्ट करून मी स्वेटर ना घेता तसाच बाहेर पडलो...
घरासमोरच असलेल्या सोसायटीच्या बागेत थोडावेळ बसून मग पुढे जऔ असे काहीसे वाटले आणि सरळ बागेत शिरलो... बागेत जाताच जाणीव झाली.. हवेतल्या धुक्याने केलेल्या जादूची...
गवताच्या प्रत्येक पानावर त्याने एक एक थेंब जणू अगदी अलगद ठेवून दिला होता...
 स्पर्श होताच ते दवबिंदू अगदी अंगाशी सलगी करून, हळूच ओघलून खालच्या गवतात पुन्हा मिसळून जात होते. आणि एक सुखद गारवा अगदी नसा-नसात भिनवत होते. मग काय.. चप्पल काढून हातात घेतली आणि तसाच अनवानि चालू लागलो.
हलू हलू गारवा वाढत होता. थोडीफार थंडी बोचू लागली. तरीही मी तसाच पुढे चालत होतो...
बागीचा संपला आणि पुढे रस्त्यावरची टपरी दिसली. परंतु, मला मात्र आता रस्थयापलीकडाची टेकडी खुणावत होती. धुक्याची चादर लपेटून अंगावरच्या हिरव्यागार वनराईमुळे सुखावलेली...
परत येताना चहा घेऊ म्हणून सरळ टेकडीवर चढून गेलो. आज वारा काय मस्त सुटला होता..
त्यातून ही मस्त धुक्याची चादर... काय सुंदर वातावरण आहे. पण आजचा वारा काही वेगळाच..
पुर्वी मी अश्या वार्यात तासन्-तास बसून राहायचो.. पण आज काही हा मला सोसवत नव्हता..
म्हणून काहीश्या अनीच्छेनेच मी घराकडे परतु लागलो.. येताना कोणत्यातरी विचारात इतका गुंग झालो..
की सरळ दारात येऊन थांबलो... बेल वाजवतच होतो, तेवढ्यात एक शिंक आली..
झाले... शिंक आली.. आणि मागून आमची ही आली... "काय हो आलात? आत्ताच झाडांना पाणी घातले.. आणि हे काय? शिन्कताय? तरी सांगितले होते तुम्हाला.. स्वेटर घेऊन जा.. पण ऐकनार नाही... चला आत... एक चहा करून देते आल्याचा... तो घ्या आणि झोपा शांत.. बरं वाटेल जरा..."
     मग काय बसलो वाट बघत चहाची... चहा घेतला आणि स्वेटर घालून गॅलेरीत येऊन बसलो...
तेवढ्यात आमचे शेजारी बागेतून येता येता म्हटले... "काय हो, आज गॅलेरी? काय करताय?"

"काही नाही... तजेलदार चहा पितोय... आमच्या हिच्या हातचा..."

अशी ती.... माझी आई...

ती...
जिने मला जन्म दिला...
जिणे या जन्मातील प्रत्येक क्षणाला
एक नवा अर्थ दिला..
या धरेवर पहिले पाउल टाकण्याचा अनुभव दिला..
आणि त्याहूनही... पुढे प्रत्येक पावलावर...
काहीतरी नवीन शिकण्याचा छन्द दिला...

ती...
जिच्याशिवाय मी अधुरा...
जिच्या केवळ उल्लेखानेही...
जगातील... प्रत्येक जन्म होतो पुरा..
जिने या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात काही दिले..
आणि इतके देऊनही कधी...
काहीच न मागितले...
अशी ती....
माझी आई...

पुन्हा ती....

पुन्हा.... "ती"च...

आता तुम्ही म्हणाल ही "ती" पुन्हा कशी?
आधीच स्पष्ट करतो... ही "ती" म्हणजे मला सोडून गेलेली नाही..
ही तर "ती".. जिला माझ्या बद्दल सारे काही माहीत असताना जिणे मला स्वीकारले... मला समजून घेतले, आणि माझा भूतकाळ पूर्णपणे माहीत असूनही माझ्यासोबतच आयुष्य काढायचे ठरवले... ती....



ती...
जिने मला सावरले..
जिने मला पुन्हा एकदा आयुष्य जगायला शिकवले..
जिने पुन्हा एकदा माझ्या पंखात बळ दिले...

ती...
जिला नेमके ठाऊक होते...
माझ्या भूतकाळात नक्की काय दडलंय...
त्यातूनही तिला नेमकं काही असं सापडलंय...
ज्यामुळे मला नेमका मार्ग मिळाला..
आयुष्य पुढे नेण्यासाठी...
जिने प्रत्येक पावलावर काही असे दिले...
ज्याने मला काही क्षण दिले...
आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी...

ती...
तीच तर आहे आता माझे भविष्य...
तीच तर आहे माझे सारे आयुष्य...
केवळ तिच्यासाठीच प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते...
ती रूसळी.. वा समोर जरी नसली...
तरीही मनी भीती दाटते...
ती... मला सोडून जाण्याची..
अगदी खात्री असूनही... की ती जाणार नाही..
कधीच....

ती...

ती...
कधी तिच्यासाठी मी अनेक कविता केल्या..
कधी तिच्यासाठी संपूर्ण आयुष्यही देण्याची तयारी केली..
कधी तिच्यासाठी संपूर्ण जगाशी वैर घेण्याचीही उर्मि दाखवली..
ती...
अगदी माझा श्वास.. तो थांबला
तर जणू माझे जीवनच संपून जाईल
अशी भीती वाटायची .. अशी.. ती..
ती...
जिच्यामुळे आयुष्याला एक वेगळेच वळण लागले..
जिच्यामुळे एक नाइव जीवनच जणू लाभले..
जिच्या केवळ एका होकारानेच प्रत्येक गोष्टीतले सुख मिळाले..

ती...

तिने खरेच माझे जीवन संपूर्ण बदलले..
ती नाहीए आता माझ्यासोबत..
परंतु अजूनही एक जाणीव आहे खोल कुठेतरी अंतर्मनात..
की तिच्यामुळेच केवळ मी आज जीवनात खूप काही करू शकलो.
तीच खर्या अर्थाने आजच्या "मी"ची खरी शिल्पकार...
सत्ता मिळवण्यात जेव्हा
गुणवत्ता कमी पडते
त्या प्रत्येकवेळी.. लोकशाही हरते..
केवळ पैसा नि सत्तेच्या जोरावर
जेव्हा राजकारणाची दिशा ठरते..
तेव्हा ही लोकशाही
पुन्हा एकदा मरते..
अशीच असते का लोकशाही..?
हरणारी नि मरणारी?
इतकी रोज मरूनसुद्धा
कशीबशी जगणारी?
असे वाटत असतानाच
कधी लोकशाही पेटूनही उठाते
आणि तेव्हा मात्र
सार्‍या सत्ताधार्यांची बोबडी वळते..
कारण, त्यांना ठाऊक असते..
लोकशाही काय चीज आहे..
प्रलयनकारी पाउस किंवा
कदादणारी वीज आहे...
म्हणून तर या लोकशाहीला
कोणी डोके काढू देत नाही..
कारण, तसे केल्याशिवाय जनता..
राजकारण्यांना भीत नाही...
थंडी इतकी वाढलीये
की सारी शाईच गोठून गेलिये...
मनातली प्रत्येक संवेदनाही जणू...
या थंडीने गारठून गेलिये..

म्हणूंच बहुदा यायला तिला
झाला असावा उशीर...
पण काय करू.. थंडीच इतकी..
आता धरवत नाहीए धीर...

तिच्या येण्यानेच बहुदा आता
निसर्गात बहार येईल...
तिच्या येण्यानेच बहुदा आता..
मिठी माझी उबदार होईल....
प्रेमात तर असतोच माणूस आयुष्यभर...
आकांत बुडालेला..
कधी तो आईच्या पदराच्या...
कधी नवे चमचमीत मागणार्‍या आपल्याच उदराच्या..
कधी धुंध करणार्‍या मदिरेच्या
कधी क्षुब्ध होऊन रुधिराच्या...

प्रेमात पाडतोच मनुष्य..
अगदी रोज..
कोणाच्या ना कोणाच्या,
इतकेच की ते कधी टिकते क्षणापुरते..
कधी त्याला आयुष्यही न पुरते...

प्रेम करतोच प्रत्येकजण..
कधी सजीवावर... निर्जिवावर...
कधी या सार्‍याच निसर्गावर...

प्रेम कधी चुकत नाही बरे...
कोणालाच...
आणि ते मिळतही नाही सहसा.... प्रत्येकालाच...

कारण, प्रेमात पडल्यावर
त्याची जाणीव व्हायला हवी..
आणि ती व्हायला... आपण..
आपल्याच मनाला.. जरा.. मोकळीक द्यायला हवी...

प्रेम? हे काय असतं?

प्रेम? हे काय असतं?
मला नाही ठाऊक..
मला इतकाच माहीत...
की ती नसताना माझा जीव का जाणे.. व्याकुळ होतो..
तिच्या एका नजरेसाठी...
मी अगदीच अगतिक होतो...
कधी ती समोर असते, तेव्हा अगदी
हरवून जातो...
कोणास ठाऊक कोण्या आसमन्तात भटकत असतो..
तिच्या केवळ येण्यानेच जणू
सारी सृष्टी बदलून जाते...
प्रत्येकवेळी काही नवी दृष्टी देऊन जाते..
असाच मग मी काही बाही लिहीत राहतो
तिच्यासाठी...
ती नसताना आठवत राहतो.. आमच्या भेटीगाठी..

यालाच प्रेम म्हणत असतील,
तर मला ठाऊक नाही..
एक मात्र खरं...
तिच्याशिवाय माझी कल्पना...
मलातरी करवत नाही..

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

एकदा का मनाला पंख फुटले
की ते उडायला लागतं...
अगदी कल्पनेच्या जगातल्या
कोणत्याही कोपर्‍यात नेऊन
आपल्याला सोडायला लागतं..
आणि मग तेथून परत येताना
तेच काही शब्द देऊन जातं...
प्रत्येक शब्द बसू शकेल अशी
एक छानशी यमकाची पेटी देऊन जातं..
आपण फक्त प्रत्येक शब्द
त्या त्या चौकटीत बसवयचा..
की त्याची होते एक सुंदरशी कविता...
जरा जग फिरवून आणतो तुला...
मग सांगतो.. तुझ्या कोणत्या अदेला नक्की भुललोय ते...
म्हणजे बघ तो ताज महालसुद्धा
तुझ्या रंगासमोर कसा सावळा दिसू लागलाय...
आणि तुझ्या चरित्र्याच्या उंचीसमोर
तो आयफेल टॉवरही कसाखुजा वाटू लागलाय...
तुझ्या हास्याच्या खळखळाटासमोर
तो नायगारा फॉलही कशा अगदीच चीडीचूप राहतो...
तुझ्या नजरेच्या तेजाने
अगदी सार्‍या जगातील तारेच जणू किलकिलु लागलेत..
तुझ्या कल्पनेच्या उडी पुढे
चीनच्या भिंतीचे अंतरही अगदी नगण्य वाटू लागले आहे..
आता तूच सांग कोणती आहे अशी तुझी अदा..
ज्यावर मी भूलू शकत नाही?
तुला तरी सापडतय का काही?
पहाटेची हूडहूड, वार्याची मंद गती...


विझलेल्या शेकोट्या नि भिजलेली माती..

दवाचे मोती... धुक्याची चादर...

चुलीची उब किंवा आईचा पदर....

हळूच उघडणारे किलकिले दार...

हौशी पहिलवानांनी भरलेला पार...

कौलातल्या झरोक्यातून येणारा

उन्हाचा इवलासा कवडसा..

घरातल्या नव्या जोडप्याने

शोधलेला आडोसा..

मध्येच येणार्‍या झुलुकेने

तिच्या सर्वांगावरचा शहारा...

त्यातून वाचण्यासाठी

त्याच्या मिठीचा पहारा...

गुलाबी थंडीत सृष्टीचा न्यारा रंग

तेवढ्याच गुलाबी प्रेमात तेही दोघे दंग....