बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

पाखरू..

एक पाखरू... चुकलेलं
आईच्या मायेला... मुकलेलं..
घरतानही त्याचं.... तुटलेलं
फिरून फिरून.. थकलेलं..

त्याचंही एक घरट होतं..
त्याचंही एक जग होतं..
त्याचीही काही स्वप्नंहोती..
त्याचीही एक झेप होती..

नियतीनं मात्र घातला घाला..
वादळ आलं, घरट मोडळं...
आई हरवली, स्वप्न भंगलं...
क्षणात सारं संपून गेलं..

फिरून फिरून थकल तरी
पाखरू कधीच खचलं नाही..
नियनीनं सारं नेलं तरी
जगण्याची उमेद सोडली नाही..

आज त्याचं घरट आहे..
आज त्याचं जगही आहे..
मनात नियतीचे घाव तरीही
चेहर्यावर प्रसन्न भाव आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा