मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

तिच्याबद्दल

तिच्याबद्दल बोलायला
इतका आतुर होतो मी..
कविता करायला बसलो,
की पहिला शब्द येतो.. "ती"

झोपी जाताना बाप्पानंतर
नाव तीचेच येते मनी..
झोपीगेल्यानंतरही
तीच भरून राहते स्वप्नि...

पहाट जाउन सकाळ येते
जागे होताना उन दिसते..
त्या किरणांतून तीच स्मरते..
नंतर सृष्टी दर्शन देते..

दिवसभराच्या कामातुनही
तीचाच विचार चालू असतो..
ती असली, नसली तरी. .
मी तिच्यातच बुडून गेलेला असतो..

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

कित्येक वेळा जन्मभर
उभा असतो वृक्ष...
वाट पाहतो पावसाची...
जरी होऊन जातो रूक्ष..

पाउस काही पडत नाही..
पालवी काही फुटत नाही..
शेवटी गळून पडतो धरेवर...
पण त्याची इच्छा पुरी होत नाही..

नंतर कधीतरी येतो पाउस..
मग त्या खोडात पालवी फुटते..
पण अश्या वेळी त्या वृक्षाला..
खरेच... कसले सुख मिळते?

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

मी.. प्रवासी.. खिन्न रात्रीचा

काळोख्या खिन्न रात्रीचा
एक प्रवासी मी..
किर्रतेच्या सहवसातील..
एक निवासी मी...

कधी शहारुन येते एकांती
कधी उरात भीती दाटते,
अस्तित्व क्षणाचे माझे,
संपणार... कधी वाटते...

यत्न करिता पळण्याचा..
रात्र जखडूनी ठेवते...
आता सुटका केवळ मृत्यू
जाणीव होत राहते....

शून्य

विश्व एक शून्य...
शून्यातला मी एक...
शुन्यालाच अर्पिलेला..
क्षण माझा प्रत्येक...

लढत राहतो अस्तित्वाशी..
पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी..
झुगारूनी सृष्टीचे नियम सारे..
शून्याची वृद्धी करण्यासाठी..

शून्य पाहता वाटे नगण्य...
परि असे तो सर्वस्व अनंत...
सुरवात विश्वाची शून्याशी होते..
त्यातच होतो... विश्वाचा अंत..

पिल्लू... लौकर ये.

A poem dedicated to all Mothers...
Who are waiting for their children to be back home...
Who are expecting a baby in their lives for a long time...
for those... who want to be a mother... But, destiny is not being kind with them...

GOD... PLEASE HELP THEM... :'(

एक चिउ वाट पाहतिये,
तिच्या हरवलेल्या पिल्लाची..
आठवण आहे तिला..
पिल्लू घरट्यातच ठेवल्याची..

सकाळी गेली तेव्हा
पिल्लू झोपलेलं होतं..
रात्रभर दंगा करून
तकलेलं होतं...

उठल्यावर त्याला भूक लागेल
हे चिऊला ठाऊक होतं.
त्याला खायला काय आवडेल
हे तिला माहीत होतं..

म्हणून चिउ गेली होती..
पिल्लुचा खाऊ आणायला...
खाऊ घेऊन ती परत आली..
लाडक्या पिल्लूला बघायला..

पण पिल्लू कुठेच दिसलं नाही..
शोधूनही सापडलं नाही...
आता चिउ उदास झालीय...
पिल्लू ला शोधून निराश झालीय...

पण तिला आशा आहे...
तिचं पिल्लू परत येईल...
आई म्हणून हाका मरेल...
पटकन चिउच्या कवेत शिरून..
तिच्यावर पोट भरून प्रेम करेल..

एक चिउ वाट पाहतिये,
तिच्या हरवलेल्या पिल्लाची..

पिल्लू... लौकर ये... येशील ना..
आई वाट पाहतिये रे..

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

रिमझिम पावसात ...

रिमझिम पावसात
वाट नागमोडी जाते..
तिला पाहताना मन
आठवणीत रमते...

याच वळणी वाटेच्या
भेट तिची झाली होती
तिला पाहताना माझी
झोप उडालेली होती..

हीच वाट होती साक्षी...
प्रेम वाढताना पहिलेली...
इथेच आम्ही एकमेकांना,
जन्माची वचने दिलेली..

आम्ही मांडीलेला खेळ
नियतीने उधळला
साता जन्माची गाठ
क्षणात तोडून गेला..

याच वाटेवर तिची
भेट शेवटची झाली..
तेव्हा अश्रूंच्या धारांनी
वाट झाली होती ओली...

भेट तुझी अन् माझी..

अस्ताला जाणारा सूर्य,
फेसाळणार्‍या लाटा...
रूपेरी वाळूचा किनारा
अन् सांजेचा मंद वारा...

अश्या सोनेरी सांजेला
भेट तुझी अन् माझी...
जणू, खलाळणार्‍या नदीचे
होते मिलन सागराशी...

विनायक बेलोसे