गुरुवार, १० डिसेंबर, २००९

असंच होतं..


मी सोबत असलो की ती माझ्याकडे पाहतही नाही..
आणि दूर गेलो की म्हणते.. तुझ्याशिवाय राहावत नाही..
जेव्हा म्हणतो तू खूप सुंदर दिसातेस..
ती म्हणते तू ख्तां बोलतोस..
आणि जेव्हा काहीच म्हणत नाही तेव्हा म्हणते.. तुला माझी कदरच नाही..
मी जेव्हा जेव्हा तिला आठावू पाहतो,
टी नेहमीच वेगळी आठवते..
जेव्हा तिच्या जवळ असतो.. ती दरवेळी नवीच भासते..
तिचे सारे असेच असते..
अनपेक्षित.. अगदी.. अनपेक्षित..
तरीही तिच्यासारखी तीच..

एक प्रश्न माझ्यातल्या कवीला..


तिच्या आठवणीत मी लिहिल्या कविता..

पण नाही जमलं ती असताना काही..
अगदी थोडं जरी जमलं असतं.. तेव्हा..
आज ती इथे असती..
मग लिहिल्या असत्या तिच्यावरच्याच कविता
अगदी तिच्या समक्ष..
अं केले असते राजी तिला अगदी विश्वंतापर्यंत साथ देण्यासाठी..
पण कदाचित नव्हते नशिबी तिचे माझ्या सोबत रहाणे..
राहिली ही असती ती कदाचित पण..
मग.. खरंच मी कवी झालो असतो??
दणके देऊन सत्ता हलवण्याचा
जमानाही गेला,
सत्तेसाठी, जो तो स्वतः
विकलाही गेला

तत्वे सत्वे येतातच
नेहमी सत्तेच्या मुळाशी
देणे घेणे केवळ सत्ता
ना कोण्या कुळाशी..

विरोधकांना एकच काम
केवळ विरोध करणे..
सत्तधारी मात्र पाहती,
खिसे स्वतःचे भरणे

आज आम्ही तर उद्या
तुम्ही वाटून घेणे आहे,
दणके सोडा, कामे करा ..
अन्यथा
हा महाराष्ट्र विकणे आहे...
कितीक आले, कितीक गेले आम्हा घालवण्यासाठी,
कोणासाही जमले नाही आणि जमनारही नाही,
पक्ष कोणताही असो, आम्ही तिहे तुम्हा दिसू
कोठूनही हलवता आम्ही पुन्हा नव्याने वसू...
वृत्ती आमची अशीच की कोणीही वंदन करी...
आम्ही कोण म्हनुनि काय पुसता आम्ही "सत्ताधारी"
अरे.. लाखांनी येतील असे प्रस्ताव, विरोधात आमुच्या,
तरीही दाखवू आसमान तुम्हा , जर जाल वाट्याला आमुच्या..
नका करू धाडस असले, उगा कशाला वैर...
सत्ता आमुची, ताकद आमुची, कोण देईल तुम्हाला धीर?


(समस्त सत्ताधार्यांच्या वतीने एक माजयुक्त संदेश... समस्त समाजास.. ... )
मोठा तर मी तेव्हाच झालो..
जेव्हा झाली जाणीव..
कोणीतरी असावे लागते,
आयुष्य पूर्ण होण्यासाठी..
पण मग "ती" भेटली..
सारे काही अगदी व्यवस्थित जमले
आणि वाटले आपण मोठे झालो..
थोडक्यात काय,
पुन्हा एकदा वाटले जणू हीच ती वेळ..
आपण मोठे झालो त्याची..
आणि असे वाटत असतानाच
अचानक सारे जगच जणू विरुद्ध उभे ठकल्याची...
तेव्हा पूर्ण ताकदिनशी सामोरा गेलो सर्वांना.. केवळ तिच्यासाठी..
तेव्हा वाटले पुन्हा एकदा .. आपण मोठे झालो..
पण अचानक, एक दिवस 'ती' मला सोडून गेली..
तेव्हा मात्र अगदी लहान मुलासारखा राडलो..
अगदी एकटाच..
पब हलू हलू त्याचीही सवय झाली..
इतकी की कितीही मोठे दुःख आले तरीही दगमगलो नाही..
तेव्हा मात्र खात्री झाली.. मी खरेच मोठे झाल्याची..
आयुष्यात खूप काही अगदी
मिळाल्यासारखे वाटते
पण त्याच वेळी नेमके आयुष्यावर
अनिश्चिततेचे सावट दाटते..
ते इतके गहिरे होत जाते
की आपण सार्‍याच आशा सोडून बसतो..
आणि आपल्या सर्वात आवडत्या गोष्टीही गमावून बसतो..
तोच क्षण महत्वाचा असतो प्रत्येकसाठी..
आपले आयुष्य ताकदिनिशि
भांडून परत मिळवण्यासाठी..
इथे जर हारलो तर मात्र आयुष्य संपून जाते..
अन् जिंकलो तर मात्र आपण
ध्रुवाप्रमाणे अगदी नभात सर्वोच शिखरावर जाउन बसतो

आम्हाला वेगळं व्हायचय...

भारत, एक प्राचीन देश. तसा देश आत्ताचा पण प्राचीन प्रदेश... म्हणता येईल.. अगदी खंडप्राय देश असेही म्हणता येईल... तर या खंडप्राय प्रदेशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अगदी रामायण-महाभारत, वेद-पुराणांपासुनचा.. अगदी जेव्हापासूनाच्या कथा-दंतकथा, कागदपत्रे, भौगोलिक पुरावे या सर्वांतून लक्षात येते, की या देशात अनेक राज्ये होती. आणि ती गेल्या हजारो पिढ्यांमध्ये अनेक राज-घराण्यांकडे होती. अगदी, हैदराबादच्या निजामाचा पाडाव होईपर्यंत. आणि त्यानंतर भारत पूर्णतः एक झाला. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारिपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत. भारत स्वतंत्र झाला. त्यात भाषेच्या आधारावर प्रांत पाडले गेले. सारे काही ठीक चालू असतानाच पुन्हा काही क्षेत्रीय नेत्यांनी, सामाजांनी, आपल्यावर अन्याय होत असून आम्हाला वेगळे राज्य हवे अश्या मागण्या सुरू केल्या. त्याचीच परिणती, झारखंड, छत्तिसगड अश्या राज्यांच्या उदयात झाली.

बरे, हे सारे एवढ्यावर थांबलेले नाहीए.
उत्तर-पूर्वेत, बोडोराज्य,
उत्तरप्रदेशात - हरितप्रदेश, पूर्वांचल. एवढेच काय तर उत्तर-प्रदेश, बिहार, छत्तिसगड येथील काही भागांचे मिळून भोजपुर राज्यही केद्र-शासनाकडे प्रस्तावित आहे.
मध्यप्रदेशात - बुंडेलखांड
बंगाल मध्ये - गोरखाराज्य, ग्रेट न्यू कूच बिहार
आंध्रप्रदेशात - तेलंगाणा
कर्नाटकात - कुर्ग, तुलुराज्य
महाराष्ट्रात - विदर्भ, कोकण (स्वतंत्र कोकणराज्य पक्षसुद्धा आहे), मग कदाचित मराठवाडा, खानदेश...
तामीळनाडूमध्ये - वानमाई - यात कर्नाटक, आंध्र, आणि तामीळनाडू यांच्या एकत्रित सीमारेशेवरील 'वेन्नियार' लोक एक वेगळ्या राज्याची मागणी करीत आहेत.
गुजरात- सौराष्ट्र.
बिहार - मिथिलांचल.
राजस्थान - राजपुताना


ही यादी अशीच वाढत जाणार काय?
यापैकी १० राज्यांचा प्रस्ताव आत्ताच केंद्रशासनाकडे आलेला आहे.
आपण पुन्हा एकदा जुन्या भारताकडे चाललो आहोत काय? याचे परिणाम काय होतील? भारत एक देश म्हणून अस्तित्वात राहील?

नक्की कशामुळे होतेय हे सारे? राजकारण? लोकांची इच्छा? की आणखी काही?